Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Champions League : मँचेस्टर सिटी अंतिम फेरीत; पॅरिसचा उडवला धुव्वा   

Champions League : मँचेस्टर सिटी अंतिम फेरीत; पॅरिसचा उडवला धुव्वा   

सिटीने पॅरिस सेंट जर्मान संघाचा ४-१ असा धुव्वा उडवला.

Related Story

- Advertisement -

रियाद महारेझच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मँचेस्टर सिटीने युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत दोन लेगमध्ये मिळून सिटीने पॅरिस सेंट जर्मान संघाचा ४-१ असा धुव्वा उडवला. सिटीने मागील आठवड्यात या लढतीचा पहिला लेग २-१ असा जिंकला होता. तर आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या लेगमध्ये (परतीचा सामना) त्यांनी पॅरिसला २-० असे पराभूत केले. सिटीकडून दोन्ही गोल महारेझने केले. चॅम्पियन्स लीग ही व्यावसायिक फुटबॉल सर्वात मोठी स्पर्धा मानली जात असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची सिटीची ही पहिलीच वेळ ठरली.

नेयमारचा निराशाजनक खेळ 

मंगळवारी रात्री झालेल्या दुसऱ्या लेगमध्ये पॅरिसचा स्टार खेळाडू किलियन एम्बापे दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तसेच त्यांचा दुसरा स्टार खेळाडू नेयमारने निराशाजनक खेळ केला. याचा फटका पॅरिसला बसला. सिटीने मात्र सुरुवातीपासून अप्रतिम खेळ केला. त्यांनी भक्कम बचाव केला आणि त्यांना आक्रमणात गोलच्या संधीही निर्माण करण्यात यश आले. महारेझने ११ व्या आणि ६३ व्या मिनिटाला गोल करत सिटीला हा सामना २-० असा जिंकवून दिला. दरम्यान ६९ व्या मिनिटाला पॅरिसचा खेळाडू अँजेल डी मारियाला रेड कार्ड मिळाले.

- Advertisement -