घरक्रीडाUEFA Champions League : रियाल माद्रिद, मँचेस्टर सिटीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

UEFA Champions League : रियाल माद्रिद, मँचेस्टर सिटीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Subscribe

रियाल माद्रिदने अटलांटाचा, तर मँचेस्टर सिटीने बुरुसिया मोंचेनग्लाडबागचा पराभव केला.

रियाल माद्रिद आणि मँचेस्टर सिटी या संघांना युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश आले. उप-उपांत्यपूर्व फेरीत रियाल माद्रिदने इटालियन संघ अटलांटाचा, तर मँचेस्टर सिटीने जर्मन संघ बुरुसिया मोंचेनग्लाडबागचा पराभव केला. उप-उपांत्यपूर्व फेरीचा पहिला लेग २-० असा जिंकणाऱ्या मँचेस्टर सिटीने दुसऱ्या लेगमध्येही २-० अशी बाजी मारत एकूण ही लढत ४-० अशी जिंकली. दुसऱ्या लेगमध्ये सिटीकडून केविन डी ब्रून आणि इल्काय गुंडोगन यांनी गोल केले. पहिल्या लेगमध्ये सिटीकडून बर्नार्डो सिल्वा आणि गॅब्रियल जेसूस यांनी गोल केले होते.

बेंझमा, रॅमोसचे गोल

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये रियालने अटलांटावर ३-१ अशी मात केली. या सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अटलांटाच्या गोलरक्षकाने केलेल्या चुकीमुळे ३४ व्या मिनिटाला रियालला गोलची संधी मिळाली. या संधीचे गोलमध्ये रूपांतर करत करीम बेंझमाने रियालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात कर्णधार सर्जिओ रॅमोस आणि मार्को असेन्सिओने आणखी दोन गोलची भर घातल्याने रियालने हा सामना ३-१ असा जिंकला. रियालने दोन लेगमध्ये मिळून ही लढत ४-१ अशी जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -