Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा UEFA EURO : युरो २०२० स्पर्धेत सर्वाधिक गोल, पण सर्वोत्तम संघात रोनाल्डोला...

UEFA EURO : युरो २०२० स्पर्धेत सर्वाधिक गोल, पण सर्वोत्तम संघात रोनाल्डोला स्थान नाही!

स्ट्रायकर म्हणून बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूला पसंती देण्यात आली.      

Related Story

- Advertisement -

युरोपियन फुटबॉल संघटना युएफाने युरो २०२० फुटबॉल स्पर्धेच्या सर्वोत्तम संघाची मंगळवारी निवड केली. पोर्तुगालचा सुपरस्टार कर्णधार आणि यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डोला या संघात स्थान मिळाले नाही. यंदाच्या युरो स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो आणि चेक प्रजासत्ताकचा पॅट्रिक शिक हे खेळाडू संयुक्तरित्या अव्वल स्थानी राहिले. या दोघांनाही पाच-पाच गोल करण्यात यश आले. परंतु, या दोघांनाही स्पर्धेच्या सर्वोत्तम संघातून वगळण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडला पराभूत केले. त्यामुळे इटली आणि इंग्लंडच्या अनुक्रमे पाच आणि तीन खेळाडूंना सर्वोत्तम संघात स्थान मिळाले.

इटलीच्या पाच खेळाडूंची निवड

इटलीचा गोलरक्षक जिआनलुईजी डोनारुमाने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे त्याला सर्वोत्तम संघात स्थान मिळणार हे निश्चितच होते. त्याचप्रमाणे लिओनार्डो बोनुची आणि लिओनार्डो स्पिनाझ्झोला हे बचावपटू, तसेच मध्यल्या फळीतील जॉर्जिन्हो आणि आघाडीच्या फळीतील फेडेरिको किएसा या इटालियन खेळाडूंची सर्वोत्तम संघात निवड झाली.

- Advertisement -

स्ट्रायकर म्हणून लुकाकूला पसंती

इंग्लंडच्या कायेल वॉल्कर आणि हॅरी मग्वायर या बचावपटूंना, तसेच आघाडीच्या फळीतील रहीम स्टर्लिंगलाही या संघात स्थान मिळाले. स्पेनच्या पेड्री आणि डेन्मार्कच्या पिएर एमिल-होईबर्ग या मधल्या फळीतील खेळाडूंचीही या संघात निवड झाली. तसेच स्ट्रायकर म्हणून बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूला पसंती देण्यात आली.

- Advertisement -