Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा UEFA EURO : इटलीची वेल्सवर मात; दोन्ही संघांना बाद फेरी गाठण्यात यश

UEFA EURO : इटलीची वेल्सवर मात; दोन्ही संघांना बाद फेरी गाठण्यात यश

इटलीचा हा यंदाच्या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला.

Related Story

- Advertisement -

माटेओ पेसिनाच्या गोलच्या जोरावर इटलीने युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेत वेल्सचा १-० असा पराभव केला. या सामन्यात ३९ व्या मिनिटाला इटलीला फ्री-किक मिळाली होती. मार्को वेराटीच्या पासवर पेसिनाने गोल करत इटलीला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखली. इटलीचा हा यंदाच्या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी गट ‘ए’मध्ये अव्वल स्थानी राहत बाद फेरी गाठली. वेल्सने हा सामना गमावला असला तरी त्यांनाही बाद फेरी गाठण्यात यश आले. त्यांनी याआधी स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राखला होता, तर तुर्कीचा २-० असा पराभव केला होता.

इटली ३० सामन्यांत अपराजित

इटलीच्या संघाने मागील काही काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इटलीचा संघ सलग ३० सामन्यांत अपराजित आहे. त्यामुळे त्यांनी १९३५ ते १९३९ या काळातील आपल्या सर्वोत्तम कामगिरीशी बरोबरी केली आहे. तसेच सलग ११ व्या सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला गोल करू दिलेला नाही. त्यांनी यंदाच्या युरो स्पर्धेत भक्कम बचाव करतानाच आक्रमणात चांगला खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना आपले तिन्ही साखळी सामने जिंकण्यात यश आले.

- Advertisement -

स्वित्झर्लंडच्या बाद फेरीच्या आशा कायम

दुसरीकडे स्वित्झर्लंडने तुर्कीवर ३-१ अशी मात केली. या सामन्यात सहाव्या मिनिटाला हॅरिस सेफेरोविचने गोल करत स्वित्झर्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. यानंतर झेर्दन शकिरीने २६ आणि ६८ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे स्वित्झर्लंडने हा सामना ३-१ असा जिंकला. तुर्कीचा एकमेव गोल इरफान काहवेचीने केला. या सामन्यातील विजयामुळे स्वित्झर्लंडच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत.

- Advertisement -