Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा UEFA EURO : क्रोएशियाच्या विजयात कर्णधार मॉड्रीचची चमक; स्कॉटलंडवर मात करत बाद फेरीत 

UEFA EURO : क्रोएशियाच्या विजयात कर्णधार मॉड्रीचची चमक; स्कॉटलंडवर मात करत बाद फेरीत 

स्कॉटलंडचे आव्हान साखळीत संपुष्टात आले.

Related Story

- Advertisement -

कर्णधार लुका मॉड्रीचने केलेल्या उत्कृष्ट गोलच्या जोरावर क्रोएशियाने युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात स्कॉटलंडवर ३-१ अशी मात केली. या विजयासह क्रोएशियाने युरो स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. क्रोएशियाला यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीला चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. त्यांनी इंग्लंडविरुद्ध सलामीचा सामना ०-१ असा गमावला होता, तर दुसऱ्या सामन्यात चेक प्रजासत्ताकने त्यांना १-१ असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडला पराभूत करणे त्यांना अनिवार्य होते. क्रोएशियाने आवश्यक विजय मिळवला आणि बाद फेरीत प्रवेश केला.

कर्णधार मॉड्रीचचा उत्कृष्ट गोल

स्कॉटलंड आणि क्रोएशिया यांच्यातील सामना पूर्वार्धात चुरशीचा झाला. १७ व्या मिनिटाला निकोला व्लासीचने गोल करत क्रोएशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ४२ व्या मिनिटाला कॅलम मग्रेगरने अप्रतिम फटका मारून गोल करत स्कॉटलंडला १-१ अशी बरोबरी करून दिली. उत्तरार्धात मात्र क्रोएशियाने अधिक आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना ६२ व्या मिनिटाला मिळाला. कर्णधार मॉड्रीचने उत्कृष्ट फटका मारून गोल करत क्रोएशिला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर ७७ व्या मिनिटाला इव्हान पेरेसिचने आणखी एक गोलची भर घातल्याने क्रोएशियाने हा सामना ३-१ असा जिंकला. या विजयासह त्यांनी क्रोएशियाने गट ‘डी’मध्ये दुसरे स्थान पटकावत बाद फेरी गाठली.

- Advertisement -

स्कॉटलंडला आगेकूच करण्यात अपयश

दुसरीकडे स्कॉटलंडचे आव्हान मात्र साखळीत संपुष्टात आले. स्कॉटलंडला तब्बल २३ वर्षांनंतर एखाद्या मोठ्या फुटबॉल (युरो आणि फिफा वर्ल्डकप) स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यश आले होते. परंतु, त्यांना तीन पैकी एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे केवळ एका गुणासह स्कॉटलंडचा संघ गट ‘डी’मध्ये तळाला राहिला आणि त्यांना स्पर्धेत आगेकूच करण्यात अपयश आले.

- Advertisement -