घरक्रीडाUEFA EURO : रंगतदार सामन्यात हॉलंडची युक्रेनवर मात; डंफ्रिस ठरला मॅचविनर

UEFA EURO : रंगतदार सामन्यात हॉलंडची युक्रेनवर मात; डंफ्रिस ठरला मॅचविनर

Subscribe

हॉलंडचा संघ सात वर्षांनंतर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळत होता.

सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना डेन्झेल डंफ्रिसने केलेल्या गोलच्या जोरावर हॉलंडने युएफा युरो २०२० च्या रंगतदार सामन्यात युक्रेनचा ३-२ असा पराभव केला. नेथन एकेने केलेल्या क्रॉसवर हेडर मारून गोल करत डंफ्रिसने हॉलंडला विजय मिळवून दिला. हॉलंडचा संघ सात वर्षांनंतर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळत होता. त्यांना २०१८ फिफा वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्यात अपयश आले होते. परंतु, त्यांनी युरो २०२० स्पर्धेची विजयी सुरुवात केली. ‘आम्ही या सामन्यात संतुलित खेळ केला. आम्हाला युक्रेनवर वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश आले. आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान आहे,’ असे सामन्यानंतर हॉलंडचे प्रशिक्षक फ्रॅंक डी बोर म्हणाले.

मध्यंतराला गोलशून्य बरोबरी 

या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांना चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ५२ व्या मिनिटाला युक्रेनच्या गोलरक्षकाच्या चुकीमुळे मिळालेल्या संधीचे हॉलंडचा कर्णधार जिनी वाईनआल्डमने गोलमध्ये रूपांतर केले. तर ५८ व्या मिनिटाला स्ट्रायकर वूत वेगहोर्स्टने गोल करत हॉलंडला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

युक्रेनचे दमदार पुनरागमन

हॉलंडने दोन गोलची आघाडी घेतल्यावर युक्रेनने दमदार पुनरागमन केले. ७५ व्या मिनिटाला आंद्रे यार्मोलेंको आणि ७९ व्या मिनिटाला रोमन यारेमचूकने केलेल्या गोलमुळे युक्रेनने सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. परंतु, ही बरोबरी फार काळ टिकू शकली नाही. ८५ व्या मिनिटाला डंफ्रिसने गोल करत हॉलंडला ३-२ असा विजय मिळवून दिला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -