घरक्रीडाUEFA EURO : पॅट्रिक शिकचा अविश्वसनीय गोल; चेक प्रजासत्ताकची विजयी सुरुवात

UEFA EURO : पॅट्रिक शिकचा अविश्वसनीय गोल; चेक प्रजासत्ताकची विजयी सुरुवात

Subscribe

या विजयासह चेक प्रजासत्ताकने गट ‘डी’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

स्कॉटलंडचे मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बऱ्याच काळानंतर पुनरागमन झाले, पण पहिल्याच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. पॅट्रिक शिकने केलेल्या दोन गोलच्या जोरावर चेक प्रजासत्ताकने युरो २०२० फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात स्कॉटलंडचा २-० असा पराभव केला. या विजयासह चेक प्रजासत्ताकने गट ‘डी’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. स्कॉटलंडला तब्बल २३ वर्षांनंतर एखाद्या मोठ्या फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यश आले. परंतु, आता त्यांना स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. स्कॉटलंडचा पुढील सामना शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध होणार असून त्यानंतर ते २२ जूनला क्रोएशियाविरुद्ध खेळतील. दुसरीकडे चेक प्रजासत्ताकला मात्र विजयी सुरुवात करण्यात यश आले.

पॅट्रिक शिकने केले दोन गोल

चेक प्रजासत्ताकने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याची आक्रमक सुरुवात केली. परंतु, स्कॉटलंडचा गोलरक्षक डेविड मार्शलच्या चांगल्या खेळामुळे चेक प्रजासत्ताकला गोल करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली. परंतु, मध्यंतराआधी पॅट्रिक शिकने हेडर मारून गोल करत चेक प्रजासत्ताकला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर ५२ व्या मिनिटाला शिकने अविश्वसनीय गोल केला. स्कॉटलंडचा गोलरक्षक मार्शल आपल्या लाईनपासून पुढे आल्याचे पाहून शिकने चेंडू हाफ लाईनच्या थोड्या पुढून गोलच्या दिशेने मारला. मार्शलला वेळात मागे जाणे न जमल्याने गोल झाला आणि चेक प्रजासत्ताकला २-० अशी आघाडी मिळाली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत सामना जिंकला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -