घरक्रीडाEuropa League : टॉटनहॅम, लेस्टर विजयी; आर्सनलचे अव्वल स्थान पक्के

Europa League : टॉटनहॅम, लेस्टर विजयी; आर्सनलचे अव्वल स्थान पक्के

Subscribe

आर्सनलने १८ गुणांसह गट 'बी'मध्ये अव्वल स्थान पटकावले.

आर्सनलने युएफा युरोपा लीगच्या सामन्यात डूनडाल्कवर ४-२ अशी मात केली. हा आर्सनलचा सलग सहावा विजय ठरला. त्यांनी सहा पैकी सहा साखळी सामने जिंकत १८ गुणांसह गट ‘बी’मध्ये अव्वल स्थान पटकावले. आर्सनलकडून एडी एनकेटी आणि मोहमद एलनेनी यांनी पूर्वार्धात, तर जो विलक आणि फोलारिन बालोगनने यांनी उत्तरार्धात गोल केले. दुसरीकडे टॉटनहॅम आणि लेस्टर सिटी या इंग्लिश संघांनाही त्यांचे अखेरचे साखळी सामने जिंकण्यात यश आले. लेस्टरने एईके अथेन्सचा २-० असा पराभव केला. लेस्टरकडून सेंगीझ ऊंडर आणि हार्वी बार्न्स यांनी गोल केले.

तसेच टॉटनहॅमने अखेरच्या साखळी सामन्यात अँटवर्प संघाला २-० असे पराभूत केले. टॉटनहॅम या सामन्याच्या पूर्वार्धात गोल करता आला नाही. मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र टॉटनहॅमच्या खेळाडूंनी त्यांचा खेळ उंचावला. ५७ व्या मिनिटाला कार्लोस विनीसीयस आणि ७१ व्या मिनिटाला जिओवानी लो सेल्सो यांनी गोल करत टॉटनहॅमला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत हा सामना जिंकला. हा टॉटनहॅमचा सहा सामन्यांत चौथा विजय ठरला. त्यामुळे १३ गुणांसह त्यांनी गट ‘जे’मध्ये अव्वल स्थान पटकावले. अँटवर्प संघाने १२ गुणांसह बाद फेरीत प्रवेश केला. गट ‘एच’मध्ये सेल्टिक संघाने लीलचा ३-२ असा पराभव केला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -