घरक्रीडाUEFA Nations League : ग्रीझमानचे तुफान प्रदर्शन; फ्रान्सची जर्मनीवर मात

UEFA Nations League : ग्रीझमानचे तुफान प्रदर्शन; फ्रान्सची जर्मनीवर मात

Subscribe

युएफा नेशन्स लीगच्या सामन्यात अँटोन ग्रीझमनने केलेल्या २ गोलच्या जोरावर विश्वविजेत्या फ्रान्सने जर्मनीचा २-१ असा पराभव केला.

अँटोन ग्रीझमनने केलेल्या २ गोलमुळे विश्वविजेत्या फ्रान्सने युएफा नेशन्स लीगच्या सामन्यात जर्मनीचा २-१ असा पराभव केला. हा जर्मनीचा सलग दुसरा पराभव आहे. याआधी नेदरलँड्सने शनिवारी जर्मनीचा ३-० असा पराभव केला होता. साल २००० नंतर सलग दोन स्पर्धात्मक सामन्यात पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मध्यंतराला जर्मनीकडे १-० ची आघाडी 

या सामन्यात जर्मनीने आक्रमक सुरूवात केली. याचा फायदा त्यांना १४ व्या मिनिटाला झाला. लीरॉय सानेने मारलेला फटका पेनल्टी बॉक्समध्ये फ्रान्सच्या किंपेमबेच्या हाताला लागला. त्यामुळे जर्मनीला पेनल्टी मिळाली. टोनी क्रूसने पेनल्टीवर गोल करत जर्मनीला १-० ची आघाडी मिळवून दिली. क्रूसचा ९० व्या सामन्यात जर्मनीसाठी १४ वा गोल होता.ही आघाडी जर्मनीला मध्यंतरापर्यंत राखण्यात यश आले.

उत्तरार्धात फ्रान्सचे आक्रमण 

मध्यंतरानंतर फ्रान्सने आक्रमक खेळ केला. त्यांचे आघाडीच्या फळीतील खेळाडू ग्रीझमन, किलीयन एम्बापे आणि जिरुड यांनी चांगला खेळ केला. ६२ व्या मिनिटाला लुकास हॅर्नांडेझच्या पासवर अप्रतिम हेडर मारत ग्रीझमनने फ्रान्सला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तर ८० व्या मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत ग्रीझमनने फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत फ्रान्सने हा सामना जिंकला.
- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -