Umpire Deepak Naiknavare : महाराष्ट्रातील अंपायरचा भन्नाट अंदाज; इंग्लंडचा माजी क्रिकेपटूपण हैराण

क्रिकेट सामन्यादरम्यान आपल्या अनोख्या अंदाजात अंपायरिंग करणाऱ्या महाराष्ट्रातील अंपायरची सर्वत्र चर्चा होत आहे

क्रिकेट सामन्यादरम्यान आपल्या अनोख्या अंदाजात अंपायरिंग करणाऱ्या महाराष्ट्रातील अंपायरची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हे अंपायर महाराष्ट्रातील पंढरपूरमधील आहेत. त्यांचे नाव दिपक नाईकनवरे आहे. त्यांना त्यांचे हितचिंतक आणि त्यांचा चाहता वर्ग डिएन (DN) नावाने देखील संबोधतो. दरम्यान डिएन रॉक नावाने प्रसिध्द असलेल्या अंपायरवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने देखील टिप्पणी केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे वॉनने महाराष्ट्रातील अंपायर दिपक नाईकनवरे यांचे कौतुक करत या चॅम्पियनला आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये सामील होणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.

दरम्यान, मायकल वॉनने ट्विटरवर अंपायर दिपक यांचा अंपायरिंग करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. सोबतच लिहले की, हे निश्चित आहे की आपल्या सर्वांना दिपक यांना आयसीसीच्या पॅनलमध्ये बघायला आवडेल. अंपायर दिपक यांची खासियत म्हणजे त्यांचा अनोखा अंदाज. ते अंपायरिंग करताना कधी डोक्यावर उभे राहतात तर कधी अनोखे हातवारे करतात. त्यामुळे ते सर्व चाहत्यांचे आकर्षण बनले आहेत. ते असे करणारे जगातील पहिले अंपायर आहेत. त्यांची सामन्यादरम्यान असे करण्याची प्रवृत्ती सर्वानांच भुरळ घालत आहे. क्रिकेटच्या खेळात अंपायरचे काम खूप कठीण आणि अवघड असल्याचे बोलले जाते.

जर सामन्यादरम्यान कोणत्या अंपायरने चूक केली तर सर्वांचे लक्ष अंपायरकडे असते. मात्र दीपक त्यांच्या भन्नाट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. दीपक यांचे लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. कोरोनाच्या काळात तणावात असलेल्या अनेक लोकांना त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजामुळे आनंद दिला आहे.

दिपक यांनी महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यात अंपायरिंग करून लोकांचे मनोरंजन केले आहे. एका सामन्यादरम्यान गोलंदाजाने वाइड चेंडू टाकला तर त्यांनी त्यांच्या हाताने वाइट बॉलचा निर्णय दिला नाही. तर वाइड बॉल देण्यासाठी डोक्यावर उभे राहून आपल्या पायांचा उपयोग केला. त्यामुळे त्यांचा हा अनोखा अंदाज अनेकांना भुरळ घालत आहे.


हे ही वाचा: http://ENG vs AUS Ashes Series : कर्णधार पॅट कमिन्सचा पहिल्याच सामन्यात पराक्रम; अश्विन पण झाला फॅन