घरक्रीडाअंडर-१७ महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा भारतात

अंडर-१७ महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा भारतात

Subscribe

भारतातील फुटबॉल रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला आणखी एका फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. भारताला २०२० मध्ये होणार्‍या फिफाच्या अंडर-१७ महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. मियामीमध्ये झालेल्या फिफाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी भारताने पुरुषांच्या फिफा अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.

भारतात महिलांची अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा होत असल्याने फुटबॉलच्या जागतिक नकाशावर भारतीय महिला फुटबॉल संघाला छाप उमटवण्याची संधी आहे. स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने गेल्या अंडर-१७ वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

- Advertisement -

२०१८ साली उरुग्वेमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत स्पेनच्या संघाने मेक्सिकोच्या महिला संघाचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. त्यावेळी न्यूझीलंड आणि कॅनडाचा संघ अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर राहिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -