घरक्रीडाटी-२० वर्ल्डकप २०२४ साठी अमेरिका संघ सज्ज; 'या' भारतीय खेळाडूंचा समावेश

टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी अमेरिका संघ सज्ज; ‘या’ भारतीय खेळाडूंचा समावेश

Subscribe

जगभरातील देशांच्या क्रिकेट (Cricket) मालिकांनंतर २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप (T-20 World Cup 2024) होणार आहे. या टी-२० वर्ल्ड कपचे अमेरिका (America) संयुक्त यजमान असणार आहे.

जगभरातील देशांच्या क्रिकेट (Cricket) मालिकांनंतर २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप (T-20 World Cup 2024) होणार आहे. या टी-२० वर्ल्ड कपचे अमेरिका (America) संयुक्त यजमान असणार आहे. त्यामुळे आता या वर्ल्ड कपच्या तयारीलाही अमेरिकेने सुरू केली असून, जगभरातील अनेक खेळाडू अमेरिकेत दाखल झाले आहे. अमेरिकन टीमच्या (America Team) इनिंगची सुरूवात करण्यात जबाबादारी भारतीय खेळाडूंवर असणार आहे.

भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद (Unmukt Chand) आणि खेळाडून सनी सोहेल (Sunny Sohail) या दोघांवर असणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत दाखल झालेल्या खेळाडूंमध्ये टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) जिंकून देणाऱ्या कर्णधारापासून ते न्यूझीलंडच्या (New Zealand) ऑल राऊंडरपर्यंतच्या खेळाडूंचा समावेश असल्याचे समजते.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी नाही

उन्मुक्त चंद आणि सनी सोहेल या दोन्ही क्रिकेटपटूंना भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अमेरिकेच्या संघातून त्यांची कामगिरी पुन्हा नव्याने पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अमेरिकेच्या प्लेईंग 11 मध्ये तिसऱ्या नंबरवर पाकिस्तानचा समी अस्लम आहे. चौथ्या क्रमांकावर समीत पटेल असून हा भारतीय विकेट किपर आहे.

- Advertisement -

पाचव्या नंबरवर श्रीलंकेच्या (Sri Lanka) शेहान जयसूर्याचा खेळण्याची शक्यता आहे. तर न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर कोरे अँडरसन सहाव्या क्रमांकावरून अमेरिकन टीममध्ये खेळणार आहे. सातव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) इयान हॉलंड आणि आठव्या क्रमांकावर ड्वेन पिट खेळणार आहे. तसेच, जुआन थेरॉन आणि सिद्धर्थ त्रिवेदी ही बॉलिंगमधील पर्याय अमेरिकेकडे आहेत.


हेही वाचा – IND vs WI : भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळवले जाणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -