IPL 2022 Mega Auction: Unsold ! सुरेश रैनासह ‘या’ दिग्गज खेळाडूंसाठी बोलीच लागली नाही

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाला सुरूवात झाली आहे. यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लावण्यात आलेला खेळाडू श्रेयस अय्यर ठरला आहे. तसेच हर्षल पटेलवर देखील १०.७५ कोटींची बोली लावण्यात आली असून त्याला रॉयल चॅलेंजर बंगळुरू या संघाने विकेत घेतलं आहे. मात्र, आयपीएलच्या लिलावात काही लोकप्रिय आणि सलामीवीर फलंदाज अनसोल्ड ठरले आहेत. म्हणजेच आतापर्यंत या खेळाडूंवर बोली लावण्यात आलेली नाहीये.

बोली न लावलेले खेळाडू कोण?

यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलामीवीर फलंदाज सुरेश रैना आणि स्टीव्ह स्मिथसह अजून दोन खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. सुरेश रैनाला आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज या टीमने रिटने केले नाही. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथही विकला गेला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरवर देखील बोली लावण्यात आलेली नाहीये. दुसरीकडे शाकीब अल हसन सारख्या बांगलादेशच्या अनुभवी ऑलराऊंडरलाही बोली प्रक्रियेत स्थान मिळालेलं नाहीये. मात्र, जे खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. त्यांना लिलाव प्रक्रियेत पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे.

दरम्यान, आयपीएल लिलावाच्या एक दिवसाआधी बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेत लिलावाच्या यादीत १० खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे ५९० खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या लिलावात एकूण ६०० खेळाडूंचा सहभाग आहे. याचसोबतच लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात समावेश करण्यात आलेला आहे.


हेही वाचा : IPL Auction 2022: कोट्यावधीचा लिलाव ! आयपीएल लिलावात कोणावर लागली कोट्यावधींची बोली, जाणून घ्या