US Gymnast Simone Biles : जिम्नास्ट सिमोन बाइल्स ठरली ‘टाइम मॅगजीन’च्या वर्षाची सर्वश्रेष्ठ ॲथलीट

US Gymnast Simone Biles: Gymnast Simone Biles named Time Magazine's Athlete of the Year
US Gymnast Simone Biles : जिम्नास्ट सिमोन बाइल्स ठरली 'टाइम मॅगजीन'च्या वर्षाची सर्वश्रेष्ठ ॲथलीट

प्रसिद्ध जिम्नास्ट सिमोन बाइल्सची टाइम पत्रिकाने वर्ष २०२१ ची सर्वश्रेष्ठ ॲथलीट म्हणून निवड केली आहे. सिमोनने या वर्षी अमेरिकेसाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता जिथे तिच्याकडून पदक सहज जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र,असे घडले नाही. ऑलिम्पिकच्या मध्यावर सिमोनाने मानसिक आरोग्याला प्राधान्य देत चार स्पर्धांच्या अंतिम फेरीतून माघार घेतली.

चार वेळा ऑलंपिक पदक विजेता असलेली प्रसिद्ध जिम्नास्ट सिमोन बाइल्स  ‘द टविस्टीज’ ची शिकार झाली होती. ज्यामध्ये वाऱ्याला स्थान आणि दिशा नसते. असे असूनही, त्यांनी ऑल राउंड टीम स्पर्धेत तिने रौप्य पदक आणि बॅलन्स बीममध्ये कांस्य पदक जिंकले.

टोकीयो ऑलंपिकच्या एका महीन्यानंतर पुन्हा सिमोन बाइल्स चर्चेत आली.

टोकियो ऑलंपिक च्या एक महिन्यानंतर तिने जिन्मास्टीक टीमच्या पूर्व डॉक्टर लॅरी नासर यांच्याविरुध्द लैंगिक अत्याचार प्रकरणात तिने अमेरिकन सिनेटसमोर साक्ष दिली.लॅरीवर ५०० हून अधिक खेळाडूंचे शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

सिमोन बायल्स ३० वेळा ऑलिम्पिक आणि विश्वचषक चॅम्पियन राहिली आहे आणि तिला आतापर्यंतची महान जिम्नॅस्ट म्हटले जाते.


हे ही वाचा – राहुल गांधींची २८ डिसेंबरला मुंबईत होणारी सभा पुढे ढकलली; भाई जगताप यांची माहिती