US OPEN 2018 : पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात डेल पोट्रो विरूद्ध जोकोव्हिच

अमेरिकन ओपन स्पर्धा महिला एकेरीत जपानच्या ओसाकाने सेरेनाला नमवत विजय मिळवला आहे. तर पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा डेल पोट्रो आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आमने-सामने येणार आहेत.

Juan Martin del Potro vs Novak Djokovic
नोव्हाक जोकोव्हिच विरूद्ध जुआन मार्टिन डेल पोट्रो

अमेरिकन ओपन स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून महिला एकेरीत जपानच्या ओसाकाने सेरेनाला नमवत विजय मिळवला आहे. तर पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात आता अर्जेंटिनाचा डेल पोट्रो आणि सर्बियाचा जोकोव्हिच यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. डेल पोट्रोने उपांत्य फेरीत राफेल विरूद्ध सामना खेळला ज्यात राफेल नदालने गुडघ्याच्या त्रासामुळे नदालने माघार घेतल्याने डेल पोट्रोने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक घेतली. तर जोकोव्हिचने जपानच्या केई निशिकोरीला मात देत अंतिम फेरी गाठली आहे.

अशी पार पडली उपांत्य फेरी

अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या राफेलचा सामना करावा लागला ज्यात सामन्याच्या सुरूवातीपासूनच डेल पोट्रोने सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिल्या सेटपासूनच राफेलची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला पहिल्या सेटमध्ये ७-६ तर दुसऱ्या सेटमध्ये ६-२ अशा फरकाने पराभव मानावा लागला आणि सामन्यात डेल पोट्रोने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. तर दुसरीकडे जोकोव्हिच आणि निशिकोरी यांच्यातील सामन्यात २०१८ विम्बल्डन विजेता जोकोव्हीचने ६-३, ६-४, ६-२ अशा सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.

जोकोव्हिच आणि डेल पोट्रो आमने – सामने

याआधी सर्बियाचा जोकोव्हिच आणि अर्जेंटिनाचा डेल पोट्रो हे १८ सामने एकमेंकाविरूद्ध लढले आहेत. ज्यातील १४ सामन्यात जोकोव्हिचने विजय मिळवला आहे. तर चार सामने डेल पोट्रोने जिंकले असून आता अंतिम सामन्यात कोणाची जादू चालणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील. जोकोव्हिच आणि डेल पोट्रो यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री १.३० वाजता खेळवला जाणार असून सामना इएसपीन या वाहिनीवर दाखवला जाणार आहे.