घरक्रीडाUS OPEN 2018 : पुरूष गटात नोव्हाक जोकोव्हीच विजयी

US OPEN 2018 : पुरूष गटात नोव्हाक जोकोव्हीच विजयी

Subscribe

सर्बियाच्या नोव्हाकने अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोला नमवत अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे विम्बल्डन पाठोपाठ त्याने दुसरे ग्रँडस्लॅम मिळवले आहे.

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी विम्बल्डनमध्ये विजय मिळवणाऱ्या नोव्हाकने अमेरिकन ओपन स्पर्धेतही विजय मिळवत ग्रँडस्लॅम पटकावले आहे. त्याचे हे सलग दुसरे ग्रँडस्लॅम असून त्याने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोला ६ – ३, ७- ६, ६ – ३ अशा तीन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीत नोव्हाकने जपानच्या निशीकोरीला ६-३, ६-४, ६-२ अशा तीन सेट्समध्ये नमवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तर डेल पोट्रो आणि राफेल यांच्या सामन्यात राफेल दुखापतीमुळे खेळू शकला नसल्याने डेल पोट्रो विजयी झाला होता.

असा झाला सामना

विम्बल्डन विजेत्या नोव्हाकने सुरूवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. पहिल्या सेटमध्ये सुरूवातीलाच नोव्हाकने आघाडी घेतली आणि ६-३ च्या फरकाने सेट सहज आपल्या नावे केला. पहिल्या सेटमधील विजयाने नोव्हाकने सामन्यात १-० ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या ७-६ आणि अखेरच्या सेटमध्ये ६-३ च्या फरकाने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.

- Advertisement -

आणि नोव्हाक मैदानातच पडला…

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात डेल पोट्रोने अखेरपर्यंत टक्कर दिली मात्र नोव्हाकच्या अप्रतिम बचावामुळे पोट्रोला सामन्यात आघाडी घेणे शक्य झाले नाही आणि अखेर चा विनिंग शॉट नोव्हाकने मारला आणि तो मैदानावरच कोसळला आनंदाच्या भरात नोव्हाकने असे केले असून त्याने या हंगामतील सलग दुसरे ग्रँडस्लॅम पटकावले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -