यूथ मुलींच्या गटात तनिशा कोटेचाला सुवर्ण

यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील यश

नाशिक : इंदौर येथे सुरू असलेल्या यूटीटी सेंट्रल झोन राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत यूथ १७ वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित तनिशा कोटेचा हिने अंतिम फेरीत महाराष्ट्राच्याच तिसर्‍या मनांकित पृथा वर्टीकर हिचा १३-११, ७-११, ११-९, ११-६ व ११-६ असा ४-१ सहजरीत्या पराभव करीत सुवर्ण पदक पटकावले.

पहिला गेम १३-११ असा जिंकून तनिषाने १-० अशी आघाडी घेतली, परंतु पृथा वर्टिकर हिने दुसरा गेम ७-११ असा जिंकून बरोबरी साधली. परंतु पुढच्या तिन्ही गेम तनिषाने जिंकून सामना जिंकला. तनिषाला २१ हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपउपांत्य फेरीत तिने या स्पर्धेतील प्रथम मानांकित हरियाणाच्या सुहाना सैनी हिचा १३-११, ७-११,११-५, ११-८ व ११-४ असा सहजरीत्या ४-१ असा परभाव करीत आपली सुवर्णपदकाकडील वाटचाल सुरू ठेवली. तर उपांत्य फेरीत चौथी महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीस हीचा११-६, ११-६, ९-११, ११-५ व १२-१० असा ४-१ ने पराभव करीत अंतिम फेरीतले स्थान निश्चित करत सुवर्ण पदक पटकावले.

तनिशा ही प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोले, अभिषेक छाजेड, पीयूष चोपडा, राजेश वाणी, हर्षल पवार, राज्य संघटनेचे यतिन टिपणीस, संजय कडू, रामलू पारे, योगेश देसाई, विवेक आळवणी, राम कोणकर, संजय मोडक, समीर भाटे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.