घरक्रीडावंदे मातरम क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा

वंदे मातरम क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा

Subscribe

विजय क्लब उपांत्य फेरीत

दादरच्या विजय क्लबने वंदे मातरम् क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी स्थानिक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे गोल्फादेवी, दुर्गामाता स्पोर्ट्स, अमर भारत मंडळ या संघांनाही स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. उपांत्य फेरीत विजय क्लब विरुद्ध गोल्फादेवी आणि दुर्गामाता विरुद्ध अमर भारत असे सामने होतील.

नायगाव भोईवाडा येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय क्लबने काळाचौकीच्या अमर क्रीडा मंडळाला २८-२२ असे नमवत उपांत्य फेरी गाठली. या सामन्याची चांगली सुरुवात करत विजय क्लबने मध्यंतराला १६-१० अशी आघाडी मिळवली. यानंतर सावध खेळ करत त्यांनी ही आघाडी आपल्या हातून निसटू दिली नाही आणि हा सामना जिंकला. शुभम वर्मा, रोशन थापा, श्री भारती हे खेळाडू विजय क्लबच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

- Advertisement -

दुसर्‍या सामन्यात वरळी कोळीवाड्याच्या गोल्फादेवीची मंडळाने शिवशक्तीचा प्रतिकार २२-१३ असा मोडून काढला. अक्षय बिडू, धनंजय सरोज, कल्पेश कडू यांनी दोन्ही डावात दमदार खेळ करत गोल्फादेवीचा विजय सोपा केला. दुर्गामाता स्पोर्ट्सने जय भारत मंडळाला ३९-१४ अशी धूळ चारली. प्रथमेश पालांडे, रुपेश माहूरे, करण कदम यांच्या चतुरस्त्र खेळाला दुर्गामाताच्या विजयाचे श्रेय जाते. अखेरच्या सामन्यात अमर भारतने विजय बजरंग व्यायाम शाळेचा ४०-२० असा पराभव केला. मयूर शिवतरकर, प्रसाद कोळी, रोहित शिवतरकर या सामन्यात चमकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -