घरक्रीडाSA vs PAK : डी कॉकने केली चीटिंग? फखर झमानच्या रन-आऊटवरून क्रिकेटपटू नाराज 

SA vs PAK : डी कॉकने केली चीटिंग? फखर झमानच्या रन-आऊटवरून क्रिकेटपटू नाराज 

Subscribe

डी कॉकने चेंडू नॉन-स्ट्राईकच्या दिशेने फेकला जात आहे असे झमानला भासवले.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ३४१ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना पाकिस्तानची ५ बाद १२० अशी अवस्था झाली होती. मात्र, एका बाजूने विकेट जात असताना दुसऱ्या बाजूने सलामीवीर फखर झमानने उत्कृष्ट फलंदाजी केली. झमानने १५५ चेंडूत १८ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १९३ धावा फटकावल्या. मात्र, त्याला इतरांची साथ न मिळाल्याने पाकिस्तानला विजयासाठी १७ धावा कमी पडल्या. परंतु, या निकालापेक्षाही झमानच्या खेळीची आणि तो ज्याप्रकारे धावचीत झाला, त्याची अधिक चर्चा रंगली.

- Advertisement -

सोशल मीडियावरून व्यक्त केली नाराजी 

पाकिस्तानला विजयासाठी अखेरच्या षटकात ३१ धावांची आवश्यकता होती. या षटकातील पहिल्या चेंडूवर झमानने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुसरी धाव घेताना दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने झमानचे लक्ष विचलित केले. डी कॉकने चेंडू नॉन-स्ट्राईकच्या दिशेने फेकला जात आहे असे झमानला भासवले. त्यामुळे तो धावचीत झाला आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस आणि शोएब अख्तर, तसेच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू शर्फेन रुदरफोर्ड यांसारख्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -