घरक्रीडाआर्मीच्या मोहित राठोरची पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी

आर्मीच्या मोहित राठोरची पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी

Subscribe

रविवारी पार पडलेल्या वसई विरार राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये मोहित राठोरने बाजी मारली. महिलां अर्ध मॅरेथॉनमध्ये रेल्वेच्या किरण सहदेवने प्रथम क्रमांक पटकावला. एलिट अर्ध मॅरेथॉनच्या पुरुष गटात अनिश थापाने १ तास ४.३७ मिनिटे अशी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. तसेच अनिशने २०१४ सालचा जी.लक्ष्मणनचा १ तास ४.५६ मिनिटांचा विक्रमही मोडीत काढला.

पूर्ण मॅरेथॉनमध्ये आर्मीच्या मोहित राठोरने ४२ किलोमीटरचे अंतर २ तास २४.२२ मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. मागच्या वर्षी अवघ्या दोन सेकंदाच्या फरकाने राठोर उपविजेता ठरला होता. सुखदेव सिंगने २ तास ३१.४२ मिनिटे अशी वेळ देत दुसरा क्रमांक पटकावला. हरमेंदर सिंगने तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये अनिश थापा, तिर्थ पुन आणि दिनेश कुमार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये पश्चिम रेल्वेच्या किरण सहदेवने (१ तास १७.५१ मिनिटे) बाजी मारली. गेल्या वर्षी किरण उपविजेता होती. यंदा कोमल जगदाळे उपविजेती ठरली. तर नंदनी गुप्ताने तिसरा क्रमांक पटकावला. आशियाई चॅम्पियन गोपी टी या स्पर्धेला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होते.

- Advertisement -

अठरा हजार स्पर्धकांचा समावेश असलेल्या मॅरेथॉनची सुरुवात विरारच्या विवा कॉलेजपासून होऊन समारोपही याच ठिकाणी झाला. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, वसई विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, सहाय्यक पोलिस आयुक्त दत्ता तोटेवाड या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकार्यांनी एकवीस किलोमीटरचे अंतर दोन तास पाच मिनिटात पूर्ण केले. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी राजपाल यादव, मनोज जोशी, जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, सुनील तावडे, अरुण नलावडे, कांचन पगारे, अभिजित चव्हाण, सुप्रिया पाठारे आदी कलाकार यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -