घरक्रीडासर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं निधन!

सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं निधन!

Subscribe

भारतातील सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं शनिवारी निधन झालं.

 

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील भारतातील सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं शनिवारी निधन झालं. वसंत रायजी यांनी २६ जानेवारी रोजी शंभरावा वाढदिवस साजरा केला होता. आज मध्यरात्री २.२० वाजता रायजी यांचं निधन झाल्याचं त्यांचा जावई तुषार नानावटी यांनी सांगितलं. रायजी यांच्या पश्चात पत्नी पन्ना रायजी (वय ९५) आणि दोन मुली आहेत.

- Advertisement -

वसंत रायजी यांनी मुंबईकडून १९४०च्या दशकात ९ प्रथम श्रेणी सामने खेळले. या ९ सामन्यांमध्ये त्यांनी २७७ धावा केल्या. ६८ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. १९४४-४५ साली बडोदा संघाने महाराष्ट्रावर मिळवलेल्या विजयी सामन्यात रायजी यांनी ६८ आणि ५३ अशी सर्वोच्च धावसंख्या केली होती. भारताने मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, तेव्हा रायजी १३ वर्षांचे होते. या सामन्याचे ते साक्षीदार होते. त्यांनी मुंबई आणि वडोदरा संघाकडून खेळत होते. या दोन्ही संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे.

- Advertisement -

maharashtra times

रायजी लाला अमरनाथ, विजय मर्चंट, सीके नायडू आणि विजय हजारे यांचा खेळ पाहतच मोठे झाले. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द छोटी होती, पण त्यांना लेखनाची प्रचंड आवड होती. ती आवड जोपासत त्यांनी जवळपास ३०० पुस्तके लिहिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -