घरक्रीडापराभवानंतरही व्हेलोसिटी संघ महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम फेरीत

पराभवानंतरही व्हेलोसिटी संघ महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम फेरीत

Subscribe

यंदाच्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेजर्सने 16 धावांनी व्हेलोसिटीचा पराभव केला. ट्रेलब्लेजर्स आणि व्हेलोसिटी यांच्यातील सामना अटीतटीचा होता असेही म्हणणे वावगे ठरणार नाही.

यंदाच्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेच्या (Women T20 Challenge 2022) तिसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेजर्सने 16 धावांनी व्हेलोसिटीचा (Velocity) पराभव केला. ट्रेलब्लेजर्स (trailblazers) आणि व्हेलोसिटी यांच्यातील सामना अटीतटीचा होता असेही म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण ट्रेलब्लेजर्सला विजय मिळवूनही अंतिम सामन्यात प्रवेश करता आलेला नाही. नेट रनरेट अधिक असल्यामुळे पराभूनत होऊनही व्हेलोसिटीने फायनलमध्ये (Final) धडक मारली आहे. त्यामुळे आता सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी यांच्यामध्ये फायनलची लढत होणार आहे.

या सामन्यात ट्रेलब्लेजर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 190 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना व्हेलोसिटीचा संघ 174 धावांपर्यंत पोहचला. ट्रेलब्लेजर्सकडून जेमिमाह रोड्रिगेजने अर्धशतकी खेळी केली. रोड्रिगेजने 66 धावांची खेळी केली. तसेच, गोलंदाजीत पूनम यादवने भेदक मारा करत दोन विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडनेही दोन विकेट घेतल्या. व्हेलोसिटीकडून शेफाली वर्माने 15 चेंडूत 29 धावांची खेळी केली. या डावात तिने पाच चौकार लगावले.

- Advertisement -

25 चेंडूत अर्धशतक

किरण नवगीरेने फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. तिने महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. किरण नवगीरेने 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. किरण नवगीरेने या सामन्यात 34 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. या सामन्यात कर्णधार दिप्तीला खास कामगिरी करता आली नाही. दिप्ती फक्त दोन धावा काढून बाद झाली. स्नेह राणाही 11 धावा काढून बाद झाली.

- Advertisement -

यंदाचे वर्ष शेवटचे

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे यंदाचे वर्ष शेवटचे असणार आहे. आतापर्यंत तीन वेळा महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परंतु 2022 मध्ये ही स्पर्धा शेवटच्या वेळी आयोजित केली जात आहे. त्यामागचे कारण म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर पुढील वर्षीपासून महिला आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये 6 संघ सहभागी होणार आहेत.


हेही वाचा – आयपीएल 2023मध्ये पोलार्ड मुंबईच्या संघात नसणार?, भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणतो…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -