व्यंकटेश अय्यरने द अंडरटेकरशी केली खास डिमांड, WWE चा स्टार पूर्ण करणार का चाहत्याची इच्छा?

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात व्यंकटेशने उत्कृष्ट फलंदाजी

WWE चा स्टार आणि फायटर द अंडरटेकरने मागील वर्षात WWE मधून संन्यास घेतलाय. त्यामुळे चाहत्यांची अवस्था दयनीय झालीये. स्टार रेसलरने रिंगमध्ये असताना प्रेक्षकांच्या समोर रिटायरमेंटची घोषणा केली होती. आता त्याने संन्यास घेतल्याच्या एक वर्षानंतर युवा भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने एक मोठा खुलासा केला आहे. यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात व्यंकटेशने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. दरम्यान, एका व्हिडिओमध्ये त्याने म्हटलंय की, लहानपणापासूनच मी ‘द अंडरटेकर’चा मोठा चाहता आहे. त्याल्या अंडरटेकरचा ऑटोग्राफ हवा असल्याचं त्याने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

आयपीएलमध्ये उत्कृष्ट खेळी केल्यानंतर व्यंकटेश अय्यर बुधवारी न्यूझीलंडच्या विरूद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. याआधी युवा फलंदाजाने एका बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटलंय की, भारतीय संघाचा एक भाग असल्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय. मला गर्व सुद्धा वाटतोय. याचदरम्यान, WWE चा स्टार द अंडरटेकरची त्याने प्रशंसा केली आहे.

अय्यरने आपल्या अभिनेता आणि स्टार्सबाबत व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. आपल्या लहान आठवणींना उजाळा देत त्याने म्हटलंय की, अंडरटेकर हा माझा लहानपणापासूनच आवडता हिरो आहे. कारण तो WWE चा मोठा चाहता आहे. तसेच द अंडरटेकरला तो अॅक्शन फिल्ममध्ये पाहणं पसंत करतो. परंतु व्हिडिओच्या शेवटच्या क्षणी त्याने अंडरटेकरशी एक खास डिमांड केली आहे. ती म्हणजे हा व्हिडिओ अंडरटेकरने बघावा आणि त्यांनी सही केलेला बेल्ट मला गिफ्ट करावं. अशी मागणी व्यंकटेश अय्यरला केली आहे. त्यामुळे WWE चा स्टार द अंडरटेकर अय्यरची मागणी पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.