Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा आमिर सोहेलच्या विकेटवरून डिवचणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराचा वेंकटेश प्रसादने घेतला समाचार

आमिर सोहेलच्या विकेटवरून डिवचणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराचा वेंकटेश प्रसादने घेतला समाचार

प्रसादचे उत्तर ऐकल्यावर पुन्हा त्यावर काही बोलायचे त्या पाकिस्तानी पत्रकाराचे धाडस झाले नाही.

Related Story

- Advertisement -

भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादने १९९६ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा त्यावेळचा कर्णधार आमिर सोहेलला क्लीन बोल्ड केल्याचे भारतीय चाहत्यांना आजही लक्षात आहे. उपांत्यपूर्व फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यात सोहेलने अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान प्रसादच्या गोलंदाजीवर चौकार मारल्यावर सोहेलचा आत्मविश्वास जरा जास्तच वाढला होता आणि त्याने चेंडू ज्या दिशेला जात होता, तिथे बोट करत जणू प्रसादला डिवचले. मात्र, पुढच्याच चेंडूवर प्रसादने दमदार पुनरागमन करत सोहेलचा दांडा उडवला होता. त्यामुळे ती विकेट सर्व चाहत्यांना आजही लक्षात आहे. या आठवणींना उजाळा देत प्रसादने रविवारी याबाबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यासोबत त्याने राहुल द्रविडच्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या जाहिरातीतील ‘इंंदिरानगर का गुंडा हू मै’ हे कॅप्शन दिले होते.

थोडे यश नंतरसाठीही राखून ठेवले 

पाकिस्तानी पत्रकार नजीब उल हसनैनला मात्र ही बाब फारशी आवडली नाही. ‘प्रसादच्या कारकिर्दीतील एकमेव यश’ असे म्हणत नजीबने त्याला टोला लगावला. मात्र, या पाकिस्तानी पत्रकाराचा प्रसादने चांगलाच समाचार घेतला. ‘नाही नजीब भाई…थोडे यश मी नंतरसाठीही राखून ठेवले होते. १९९९ साली इंग्लंडमध्ये पुढचा वर्ल्डकप झाला आणि मँचेस्टरला झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातच मी २७ धावांत ५ विकेट घेतल्या. त्यामुळे त्यांना २२८ धावांचे लक्ष्यही गाठता आले नाही’ असे म्हणत प्रसादने पाकिस्तानी पत्रकाराला प्रत्युत्तर दिले. प्रसादचे हे उत्तर ऐकल्यावर पुन्हा त्यावर काही बोलायचे नजीबचे धाडस झाले नाही.

- Advertisement -

- Advertisement -