घरक्रीडाPAK vs BAN : पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका; कोरोनामुळे अर्ध्यातूनच दौरा सोडणार...

PAK vs BAN : पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका; कोरोनामुळे अर्ध्यातूनच दौरा सोडणार हा दिगग्ज

Subscribe

पाकिस्तान क्रिकेटचे गोलंदाजीचे प्रमुख सल्लागार व्हर्नन फिलँडर यांना बांगलादेश दौरा अर्ध्यातूनच सोडून आपल्या मायदेशी माघारी परतावे लागत आहे

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू ओमीक्रॉनचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे.ओमिक्रॉन मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने दक्षिण आफ्रिका आणि काही इतर देशातील विमानसेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे. दरम्यान आता याचा परिणाम बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश मधील क्रिकेट मालिकेवर देखील होताना दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेटचे गोलंदाजीचे प्रमुख सल्लागार व्हर्नन फिलँडर यांना बांगलादेश दौरा अर्ध्यातूनच सोडून आपल्या मायदेशी माघारी परतावे लागत आहे. फिलँडर सोमवारीच बांगलादेश वरून दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार झाले आहेत. कारण सोमवार नंतर विमानसेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे क्रिकेटवर देखील परिणाम होत आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे मध्ये होत असलेल्या महिला विश्वचषकाची पात्रता फेरी देखील रद्द करण्यात आली आहे. तर निदेरलँड आणि दक्षिण आफ्रिकेमधील होणारी एकदिवसीय मालिका देखील रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, व्हर्नन फिलँडरला पाकिस्तान आणि बांगलादेश मधील कसोटी मालिका झाल्यानंतर आपल्या मायदेशी परतायचे होते. पण ज्या प्रकारे ओमिक्रोन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे त्यामुळे त्याला अर्ध्यातूनच मालिका सोडून मायदेशी परतावे लागले आहे.

लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघ देखील डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तो दौरा अगदी जवळ येऊन ठेपला आहे. तर भारताचा अ’ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. मात्र वाढता ओमिक्रॉनच्या प्रादुर्भाव लक्षात घेता बीसीसीआय याच्यावर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: http://R Ashwin : कानपूरच्या कसोटी सामन्यात अश्विनचा नवा विक्रम; हरभजन सिंगलाही टाकले मागे


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -