घरक्रीडाविदर्भाला सांघिक जेतेपद

विदर्भाला सांघिक जेतेपद

Subscribe

कुडाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष सांघिक गटात विदर्भाने बाजी मारली. कर्नाटकविरुद्धच्या अंतिम लढतीत दुहेरीचा सामना गमावल्यानंतर दोन्ही एकेरीचे सामने जिंकत विदर्भाने हे जेतेपद पटकावले.

विदर्भाच्या निलेश बनसोड आणि गुल खान जोडीला कर्नाटकच्या शिव कुमार आणि अरुण कुमार या जोडीने १८-१६, २०-१६ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले होते. मात्र, यानंतर विदर्भाने दमदार पुनरागमन केले. एकेरीच्या सामन्यात विदर्भाच्या इर्शाद अहमदने पहिला सेट ८-२५ असा गमावल्यानंतर पुढील दोन सेट २५-१८, २३-० असे जिंकले. दुसर्‍या लढतीमध्ये विदर्भाच्या निखिल लोखंडेने कर्नाटकच्या एम. विनोदवर २५-१२,६-२२, २५-१५ असा विजय मिळवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तेलंगणाने तामिळनाडूचा २-१ असा पराभव केला.

- Advertisement -

महिला आंतरराज्य सांघिक गटात गतविजेत्या तामिळनाडूने अंतिम सामन्यात बिहारचा २-१ असा पराभव केला. पहिल्या एकेरी सामन्यात बिहारच्या खुशबू राणीने तामिळनाडूच्या एस. रोशनीचा २१-१५,२३-१० असा पराभव केला. दुसर्‍या एकेरी सामन्यात तामिळनाडूच्या एल. एम्सवर्धिनीने बिहारच्या ममता कुमारीचा १६-१२, २४-१२ असा पराभव करत या लढतीत १-१ अशी बरोबरी केली .निर्णायक दुहेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या एम ख्वाझीमा आणि बी. शोभिका यांनी बिहारच्या संध्या सिंह आणि गुरिया राणी सिंग या जोडीचा २५-७,२२-१७ असा पराभव केला. तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा २-१ असा पराभव केला. महाराष्ट्राकडून स्नेहा मोरेने एकेरीत तर दुहेरीत मैत्रेयी गोगटे आणि पुष्करणी भट्टड या जोडीने आपले सामने जिंकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -