घरक्रीडाVijay Hazare Trophy 2018 : मुंबईला जेतेपद

Vijay Hazare Trophy 2018 : मुंबईला जेतेपद

Subscribe

मुंबईने दिल्लीचा चार विकेट राखून पराभव करत विजय हजारे चषक जिंकले.

मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीचा चार विकेटने पराभव करत विजय हजारे चषक जिंकले आहे. अंतिम सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या चांगल्या गोलंदाजीमुळे दिल्लीला फक्त १७७ धावाच करता आल्या. दिल्लीकडून हिम्मत सिंहने ४१ तर ध्रुव शौरीने ३१ धावा केल्या. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि शिवम दुबे प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तुषार देशपांडेने २ विकेट घेतल्या.

१७८ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईने अवघ्या ४० धावांत ४ विकेट गमावल्या. सिद्धेश लाडला नवदीप सैनीने बाद केले होते. पण त्याने टाकलेला बॉल नो बॉल असल्याने लाडला जीवदान मिळाले. त्याने याचा फायदा घेत आदित्य तरेसोबत पाचव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. आदित्य तरेने अप्रतिम फलंदाजी केली. ७१ धावांची खेळी करून तो बाद झाला. तर लाडने ४८ धावा केल्या. अखेर शिवम दुबेने नाबाद १९ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला. ७१ धावा करणाऱ्या आदित्य तरेला सामनावीराचा खिताब मिळाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -