वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि फिरकीपटू शम्स मुलानी यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने बिहारवर ९ विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे मुंबईने विजय हजारे चषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
तुषार देशपांडेने केले ५ गडी बाद
विजय हजारे चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजीची सुरूवात अप्रतिम झाली. गोलंदाज तुषार देशपांडेने डावाच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्याच षटकात विकास रंजनला बाद केले. देशपांडेनेच विजय भारती, बाबुल कुमार आणि कर्णधार केशव कुमार यांनादेखील झटपट बाद केल्यामुळे बिहारची अवस्था १२ व्या षटकात ४ बाद ३४ अशी होती. यानंतर रहमतउल्लाह आणि रोहित राज या दोघांनी काही काळ खेळपट्टीवर टिकाव धरला. मात्र मुंबईचा डावखुरा गोलंदाज शम्स मुलानी याने रोहित राजला बाद करत ही भागीदारी फोडली. पुढे कुंदन शर्मा, रहमतउल्लाह, अनुनय सिंग आणि आशुतोष अमन हे फलंदाजही लवकर बाद झाल्याने बिहारचा डाव अवघ्या ६९ धावांत संपुष्टात आला. मुंबईकडून तुषार देशपांडेने ५ आणि शम्स मुलानीने ३ गडी बाद केले.
सहज लक्ष्य गाठले
७० धावांचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर अखिल हेरवाडकर आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात केली. या दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. २४ धावांवर अखिल हेरवाडकरला आशुतोष अमनने बाद केले. यानंतर उर्वरित धावा रोहित आणि आदित्य तरे यांनी करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
VIJAY HAZARE TROPHY 2018-2019
MUMBAI vs BIHAR
QUARTER FINAL
14th Oct ’18
Bihar- 69/10 in 28.2 ovrs
Mumbai- 71/1 in 12.3 ovrs
Result : Mumbai won by 9 wkts
Scoresheet: https://t.co/HhnAPKQyOX— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 14, 2018