घरक्रीडाVijay Hazare Trophy: युपीला पराभूत करत मुंबईने चौथ्यांदा कोरलं विजेतेपदावर नाव

Vijay Hazare Trophy: युपीला पराभूत करत मुंबईने चौथ्यांदा कोरलं विजेतेपदावर नाव

Subscribe

आदित्य तरेची शतकी खेळी

मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशला पराभूत चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. आदित्य तरेच्या शतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने उत्तर प्रदेशला ६ गडी राखून पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने मुंबईला ३१३ धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी तडाकेबाज खेळी करत ४ गड्यांच्या मोबदल्यात ४१.३ षटकांमध्ये फायनल खिशात घातली. मुंबईकडून आदित्य तरेने ११८ धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. तर कर्णधार पृथ्वी शॉने ७३ धावांची खेळी केली आणि शिवम दुबेने महत्वपूर्ण ४२ धावा केल्या.

उत्तर प्रदेशने दिलेल्या ३१३ धावाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून सलामीला कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. दोघांनी तडाकेबाज खेळी करत पहिल्या विकेटसाठी ८९ धआवांची भागीदारी केली. शिवम मावीने शॉला बाद करत मुंबईला पहिला झटका दिला. शॉने ७३ धावा केल्या. त्यानंतर थोड्या अंतराने जयस्वाल देखील बाद झाला. त्यानंतर आदित्य तरेने मुंबईचा डाव सावरला. आदित्य तरेने शतक झळकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तरेने यावेळी १८ चौकारांच्या जोरावर नाबाद ११८ धावांची खेळी साकारली. मुंबईच्या संघाने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला होता. तरेने यावेळी चौकार लगावत मुंबईच्या विजयावर झोकात शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील तरेची ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. मुंबईच्या संघाला सय्यद मुश्ताक अहमद ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर मुंबईने या स्पर्धेते जेतेपद पटकावत अपेक्षा उंचावल्या आहेत.

- Advertisement -

पृथ्वीने रचला इतिहास

विजय हजारे करंडकामध्ये पृथ्वी सावने धडाकेबाज फलंदाजी करत इतिहास रचला. पृथ्वीने या स्पर्धेत ८०० धावांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत एकाही फलंदाजाला ८०० धावांपर्यंत पोहोचता आले नव्हते. पृथ्वीने २०२१ या मोसमात एकूण आठ सामने खेळले. या आठ सामन्यांमध्ये पृथ्वीने १६५.४० च्या सरासरीने ८२७ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत पृथ्वीची २२७ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. त्याचबरोबर पृथ्वीने या स्पर्धेत १३८.२९ स्ट्राइक रेटने धावा करताना चार शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -