घरक्रीडाViral tweet : अभिनंदन नीता भाभी..,विजय मल्ल्याचं ते ट्विट तुफान व्हायरल

Viral tweet : अभिनंदन नीता भाभी..,विजय मल्ल्याचं ते ट्विट तुफान व्हायरल

Subscribe

आयपीएल २०२२ (IPL 2022) चा १५ वा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता प्लेऑफ (Play Off) गाठण्यासाठी चौथ्या क्रमांकावर कोणत्या संघाची वर्णी लागणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाहीये. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. शनिवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) दिल्लीचा पराभव केला. आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, दिल्लीचा संघ जिंकला तर आरसीबीचा (RCB) प्रवास येथे संपू शकतो.

दिल्ली आणि मुंबई या संघात आज सामना होणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी विजय मल्ल्याचं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मल्ल्याने त्या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सच्या लिलावाच्या रणनितीचे कौतुक केले आहे. खरं म्हणजे हे ट्विट १० वर्षांपूर्वींचं आहे. मात्र, दहा वर्षानंतर हे ट्विट पुन्हा एकदा चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -

माझ्या मते आयपीएल लिलावात सर्वोत्तम खरेदी मुंबई इंडियन्सने केली आहे. त्यांच्याकडे खेळाडूंची मोठी टीम आहे. अभिनंदन निता भाभी…अशा प्रकारचं ट्विट मल्ल्याने केलं असून ते सध्या व्हायरल होत आहे. यावेळी युझर्सने विजय मल्ल्याला देखील ट्रोल केलं आहे.

- Advertisement -

आरसीबीकडून विजयाची प्रतिक्षा

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या टीमपैकी आरसीबी संघाने आतापर्यंत एकही जेतेपद पटकावलेलं नाहीये. आरसीबीला केवळ तीनदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश आलंय. २०१७ आणि २०१९ च्या सिझनमध्ये ही टीम तळाशी राहिली. २०२० च्या हंगामात टीमने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, परंतु ट्रॉफी जिंकण्यात त्यांना यश आले नाही. मात्र, यावेळी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे काम मुंबईच्या हातात आहे.

९ हजार कोटींचे बुडवले कर्ज 

विजय मल्ल्याने १७ बँकाचे मिळून ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे. मल्या २ मार्च २०१६ रोजी भारतातून पळून गेला होता. त्याने ब्रिटनमध्ये आसरा घेतला होता. त्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी मल्ल्याला भारतात आणण्यासाठी बरीच मेहनत घेतली. युकेच्या कोर्टात न्यायालयीन लढाई लढली. त्यानंतर कुठे १४ मे रोजी मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब झाले होते.


हेही वाचा : कर्जबुडव्या विजय मल्ल्याला कोणत्याही क्षणी मुंबईत आणले जाणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -