घरक्रीडाAsian games 2018: विकास कृष्णनला कांस्य

Asian games 2018: विकास कृष्णनला कांस्य

Subscribe

एशियन गेम्समध्ये भारताचा बॉक्सर विकास कृष्णन याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. डाव्या डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे.

विकास कृष्णन याला ७५ किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत विकाससमोर कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखानचे आव्हान होते. पण डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो या सामन्यात खेळू शकला नाही.

काय होती दुखापत ?

विकास कृष्णन याला याच स्पर्धेच्या एका सामन्यात डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत आणखी वाढल्याने त्याला उपांत्य फेरीतील सामना खेळता आला नाही. याबाबत भारतीय बॉक्सिंगचा एक अधिकारी म्हणाला,” विकासला जी दुखापत झाली होती ती आता आणखी वाढली आहे. त्यामुळे त्याचे या सामन्यात बॉक्सिंग करणे धोक्याचे ठरू शकते. तो आता काही आठवडे आराम करेल आणि त्यानंतर पुन्हा रिंगमध्ये उतरेल.”

एशियन गेम्समध्ये विकासचे सलग तिसरे पदक 

विकासाचे एशियन गेम्स हे सलग तिसरे पदक आहे. त्यामुळे विकासने इतिहास रचला आहे. याआधी कोणत्याही भारतीय बॉक्सरने सलग तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवलेले नाही. विकासने २०१० मध्ये विकासला सुवर्ण पदक तर २०१४ मध्ये त्याला कांस्य पदक मिळाले होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -