Homeक्रीडाVinod Kambli : कपिल देव यांच्या ऑफरवर विनोद कांबळी म्हणाला...

Vinod Kambli : कपिल देव यांच्या ऑफरवर विनोद कांबळी म्हणाला…

Subscribe

मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा चर्चेत आला आहे. नुकत्याच दादरमध्ये प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभात विनोद कांबळीने हजेरी लावली होती. त्यानंतर त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यावेळी सचिन तेंडूलकरला भेटायला आला तेव्हा त्याला जागेवरून उठायलाही येत नव्हते. या व्हिडीओवरून तो ट्रोल झाला होता. याआधीही मद्यपान केल्यामुळे तो अनेकदा वादात अडकला आहे. यावरून नुकतेच भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी त्याला एक सल्ला दिला. तो सल्ला त्याने स्वीकारला असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. (Vinod Kambli ex cricket kapil dev offer accepted)

हेही वाचा : D Gukesh : अवघ्या 18 व्या वर्षी ठरला बुद्धिबळाचा जगज्जेता; भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास 

विनोद कांबळीने नुकतेच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी तो म्हणाला की, “मी रिहॅबसाठी तयार आहे. मला जायचे आहे कारण मला कशाचीच भीती वाटत नाही. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे.” त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये त्याच्या मित्रानेच सांगितले होते की, तो चौदावेळा रिहॅब सेंटरला गेला होता. तो पुढे म्हणाला की, “मला युरिन इन्फेक्शनचा त्रास असून गेल्या महिन्यात मी बेशुद्ध झालो होतो. यावेळी माझ्या पत्नी आणि मुलामुलीने माझी काळजी घेतली. ते सध्या आजारातून बरे होण्यास मदत करत आहेत.

नुकतेच दादरमध्ये प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. यावेळी सचिन तेंडूलकर याच्यासह विनोद कांबळीदेखील उपस्थित होता. यावेळी तो म्हणाला की, मला नक्कीच आचरेकर सरांची खूप आठवण येत आहे. मी आता काय बोलू? खरं तर मला फक्त एक गाणं म्हणायचंय. शॉर्टकटमध्ये सरांचे गाणे म्हणतो, असे म्हणत विनोद कांबळीने सर जो तेरा चकराये हे गाणे गायिले होते. दरम्यान, यावेळी या दोघांचे व्हिडीओ व्हायरल झाले.


Edited by Abhijeet Jadhav