Homeक्रीडाVinod Kambli : तो खूप चांगला खेळाडू, त्याला...; विनोद कांबळीबद्दल काय म्हणाले...

Vinod Kambli : तो खूप चांगला खेळाडू, त्याला…; विनोद कांबळीबद्दल काय म्हणाले अमित शहा?

Subscribe

नवी दिल्ली : एक काळ होता जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सलामीची जोडी ही सर्वांच्या पसंतीस उतरत होती. पण एकीकडे सचिन तेंडूलकरने आपल्या खेळीमुळे एक स्वतःचे वेगळे विश्व उभे केले. तर दुसरीकडे विनोद कांबळी हा त्याच्या खेळापेक्षा इतर गोष्टींमुळेच चर्चेत राहिला. अनेकदा त्याने त्याच्या स्वभावामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये दादरमधील एका कार्यक्रमात सचिन आणि विनोद कांबळी एकत्र दिसले. पण हा व्हिडीओ व्हायरल होताच, विनोद कांबळीच्या तब्येतेची चर्चा सुरू झाली. त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला. विशेष म्हणजे त्याची दखल ही देशाची गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील घेतली आहे. (Vinod Kambli in talks Amit Shah talked about him in program)

हेही वाचा : Sunil Gavaskar : उरलेले दोन दिवस सत्कारणी लावा, हॉटेलच्या रूमवर…; गावसकरांचा टीम इंडियाला सल्ला 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद कांबळीची एक आठवण एका कार्यक्रमात सांगितली. ते म्हणाले की, “चेन्नईमधील एका क्रिकेट संदर्भातील कार्यक्रमात विनोद कांबळी मला भेटला होता. तेव्हा तो निवृत्त झाला होता. पण एका काळात तो खूप उत्तम फलंदाज होता. मी तेव्हा त्याला विचारले, तुझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. पण तू सर्वात आनंदी कधी होतात? तेव्हा विनोद म्हणाला की, मी अनेक बड्या खेळाडूंना हैराण केले आहे. अनेक सामने जिंकले आणि अनेक विक्रम तोडलेदेखील आहेत. पण आज मी सर्वात खूश तेव्हा होतो, जेव्हा एखाद्या युवा खेळाडूला मी बॅकफूटवर खेळायला शिकवतो.” अशी आठवण त्यांनी सांगितली.

नुकतेच दादरमध्ये प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. यावेळी सचिन तेंडूलकर याच्यासह विनोद कांबळीदेखील उपस्थित होता. यावेळी तो म्हणाला की, मला नक्कीच आचरेकर सरांची खूप आठवण येत आहे. मी आता काय बोलू? खरं तर मला फक्त एक गाणं म्हणायचंय. शॉर्टकटमध्ये सरांचे गाणे म्हणतो, असे म्हणत विनोद कांबळीने सर जो तेरा चकराये हे गाणे गायिले होते. दरम्यान, यावेळी या दोघांचे व्हिडीओ व्हायरल झाले.


Edited by Abhijeet Jadhav