घरक्रीडातेंडुलकरच्या अकादमीत कांबळी देणार प्रशिक्षण

तेंडुलकरच्या अकादमीत कांबळी देणार प्रशिक्षण

Subscribe

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी शिबिरात सचिनचा खास मित्र विनोद कांबळी प्रशिक्षण देणार आहे. 

सचिन तेंडुलकरने इंग्लंडमधील मिडलसेक्स क्रिकेट क्लबसोबत सुरु केलेल्या तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीचे भारतातील पहिले शिबीर नेरूळच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. हे शिबीर १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या शिबिरात जवळपास १५० मुलं-मुली सहभाग घेणार आहेत. या शिबिरात सचिनचा खास मित्र विनोद कांबळी प्रशिक्षण देणार आहे.

शिबिरं घेण्यासाठी १८ तज्ञ प्रशिक्षक

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीची भारतात एकूण ८ शिबिरे होणार आहे. या शिबिरांचे दोन वयोगटांत विभाजन करण्यात आले आहे. ७ ते १२ या वयोगटातील मुलांसाठी सकाळी ९:३० ते १:०० तर १३ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी दुपारी २ ते ५:३० या वेळेत शिबीर होणार आहे. ही शिबिरे घेण्यासाठी १८ तज्ञ प्रशिक्षकांची फळी नेमण्यात आली आहे. ज्यामध्ये विनोद कांबळीसोबतच प्रदीप सुन्दरम, उस्मान माळवी, कौस्तुभ पवार अशा रणजीपटुंचाही समावेश आहे. तर मिडलसेक्स क्रिकेट क्लबकडून प्रशिक्षक जॉश नॅपेट हे या शिबिरांमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. माजी कौंटी क्रिकेटपटू असलेले जॉश हे गेली बरीच वर्षे इंग्लंडमध्ये विविध स्तरांवर प्रशिक्षण करत आहेत.

बांद्रा आणि पुण्यातही शिबीर

डी.वाय.पाटील येथील शिबीर संपल्यानंतर मुंबईतील बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीचे शिबीर होणार आहे. तर यानंतरचे शिबीर पुण्यातील बिशप्स स्कूल येथे १२ ते १५ आणि १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल. या शिबिरांची फी १५००० रुपये आहे. तर १० % ‘अंडरप्रिवलेज्ड’ मुलांना मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी सचिन आणि मिडलसेक्सला बेसाइड स्पोर्ट्सची मोलाची मदत झाली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -