घरक्रीडा6,6,6,6,6,6,... 'या' खेळाडूने एकाच षटकात ठोकले सहा षटकार; व्हिडीओ पाहून होईल युवराज...

6,6,6,6,6,6,… ‘या’ खेळाडूने एकाच षटकात ठोकले सहा षटकार; व्हिडीओ पाहून होईल युवराज सिंहची आठवण

Subscribe

अनेकदा भारतीय संघाला (Indian Cricket Team) क्रिकेट सामन्यात कमी षटकात जास्त धावांची गरज असल्यास सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रमींना माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण होते.

अनेकदा भारतीय संघाला (Indian Cricket Team) क्रिकेट सामन्यात कमी षटकात जास्त धावांची गरज असल्यास सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रमींना माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण होते. याचे कारण म्हणजे इंग्लंड (England) विरुद्ध झालेल्या एका समान्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉडच्या गोलंदाजीवर एका षटकात सहा षटकार मारले होते. त्यावेळी युवराजच्या नावावर या नव्या विक्रमाची नोंदही झाली होती. त्यानंतर असाच पराक्रम पुद्दुचेरी T10 लीगमध्ये (Pondicherry T10) Patriots संघाकडून खेळणार्‍या कृष्णा पांडे (Krishna Pandey) याने केला आहे.

पुद्दुचेरी T10 लीगमध्ये रॉयल्स आणि पॅट्रीओट्स संघात सामना झाला. या सामन्यात फलंदाजी करताना पॅट्रीओट्स संघाकडून खेळणाऱ्या कृष्णा पांडेने रॉयल्स संघाच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. फलंदाजी करताना आक्रमक खेळी करत कृष्णा पांडेने एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. रॉयल्स संघाचा गोलंदाज नितेश ठाकूरच्या एका षटकात कृष्णाने सलग सहा षटकार खेचले.

- Advertisement -

हेही वाचा – हार्दिक पांड्या, ऋषभ पंत अखेरच्या षटकांमध्ये ‘किलर’ ठरतील; सुनिल गावसकरांचे मत

या सामन्यात रॉयल्स संघाने विजयासाठी दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना पॅट्रीओट्स संघाची अवस्था १ बाद ४१ धावा अशी झाली होती. त्यावेळी फलंदाजीसाठी आलेल्या कृष्णा पांडेने संघाचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. राईट हँड बॅट्समन कृष्णाने १९ चेंडूंत ८३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १२ षटकार आणि २ चौकार मारले. त्याच्या खेळीमुळे संघाने १० षटकांत १५० धावांचा पल्ला पार केला.

- Advertisement -

४३६.८० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करूनही तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अवघा चार धावांनी पॅट्रीओट्सने हा सामना गमावला. दरम्यान, रॉयल्सकडून आर रघुपतीने ३० चेंडूत नाबाद ८४ धावा केल्या.


हेही वाचा – श्रीलंकेला हवंय आशिया चषक २०२२ चे यजमानपद, पण निर्णय बीसीसीआय सचिव जय शाहांच्या हाती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -