Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात विराटने केला 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात विराटने केला ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

सध्या संपूर्ण जगभरात टॉलिवूडचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचीच चर्चा सुरु आहे. या गाण्याने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडत ऑस्करपासून ते गोल्डब ग्लोब पर्यंत असे अनेक पुरस्कार पटकावले आहेत. या गाण्यावरील डान्सचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत दिसून येतात. दरम्यान, आता या गाण्याची भुरळ भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला देखील पडल्याचं दिसून येत आहे.

विराटचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना सुरु असताना विराट कोहली स्टेडियममध्ये ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. विराट यात ‘नाटू नाटू’ गाणयातील हुक स्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून विराटचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. अनेकजण विराटचं कौतुक करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, याआधी देखील विराट कोहलीचा शाहरुखच्या ‘पठाण’मधील ‘झूमे जो पठाण’गाण्यावरील एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात विराट कोहलीसोबत रवींद्र जाडेजा देखील नाचताना दिसत होता. त्यांच्या या डान्सचं कौतुक स्वतः शाहरुखने देखील केलं होतं.

सुनील गावसकरांनीही केला होता ‘नाटू नाटू’वर डान्स

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी या गाण्याची आयकॉनिक डान्स स्टेप केली होती. वयाच्या 73 व्या वर्षी देखील सुनील गावस्कर यांचा उत्साह पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कॉमेंट्री करणाऱ्या गावस्करांनी  खेळ सुरू होण्यापूर्वी नाटू-नाटू डान्स स्टेप करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


- Advertisement -

हेही वाचा :

सिद्धार्थ जाधवच्या या कृतीने सर्वच भारावले; अशोक मामांनाही अश्रू अनावर

- Advertisment -