घरक्रीडाFIFA 2018 : हॅरी केनला विराटकडून शुभेच्छा

FIFA 2018 : हॅरी केनला विराटकडून शुभेच्छा

Subscribe

आज इंग्लंड फुटबॉल संघाचा फिफा विश्वचषक २०१८ मधील पहिलाच सामना आहे. टय़ुनिशिया विरुद्ध इंग्लंड असा सामना आज आपल्याला पहायला मिळणार आहे.

फिफाचा २१ वा विश्वचषक रशियात सुरू झाला आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. अशावेळी फुटबॉलप्रेमी विराटनेही इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनला शुभेच्छा देत आपला उत्साह दर्शविला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट फुटबॉलचा चाहता असल्याचे आपल्याला ठाऊक आहेच. नुकत्याच त्याने इंग्लंड फुटबॉल संघाच्या कर्णधाराला शुभेच्छा देऊन आपले फुटबॉलवरील प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

- Advertisement -

 

इंग्लंडची आज विश्वचषकातील पहिली लढत

इंग्लंड फुटबॉल संघाचा आज फिफा विश्वचषक २०१८ मधील पहिलाच सामना आहे. ट्युनिशिया विरुद्ध इंग्लंड असा सामना आज आपल्याला पहायला मिळणार आहे. यापूर्वी १९९८ च्या विश्वचषकात इंग्लंड आणि ट्युनिशिया आमने-सामने आले होते. तेव्हा ट्युनिशियाला २-० च्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. तब्बल २० वर्षानंतर पुन्हा इंग्लंड ट्युनिशिया समोरासमोर आल्यानंतर नक्की काय होणार हे पाहाण्याजोगे असेल. इंग्लंड फुटबॉलसाठी मागील वर्षभराचा काळ अत्यंत भरभराटीचा ठरला आहे. फिफा अंडर २० आणि फिफा अंडर १७ विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंडने मिळवले असून आता इंग्लंड सिनीयर फुटबॉल संघ काय कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -
england-football-team
इंग्लंडचा फुटबॉल संघ

आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात फुटबॉलमधील बलाढ्य संघांकडून खास कामगिरी होताना दिसत नाहीये. जर्मनी, स्पेन, अर्जेंटीना या संघांचा यात समावेश होतो. जर्मनीचा मेक्सिकोने केलेला धक्कादायक पराभव तर स्पेन, अर्जेंटीना यांचे बरोबरीत झालेले सामने यानंतर आता इंग्लंडच्या संघाचे प्रदर्शन पाहाण्याजोगे असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -