घरक्रीडाVirat Kohli : केवळ 6 धावांची गरज; पहिल्याच सामन्यात कोहली करणार विश्वविक्रम?

Virat Kohli : केवळ 6 धावांची गरज; पहिल्याच सामन्यात कोहली करणार विश्वविक्रम?

Subscribe

वर्षभरापासून क्रिकेटप्रेमींच्या प्रतिक्षेत असलेल्या आयपीएलच्या 17 व्या पर्वाची सुरूवात उद्यापासून (22 मार्च) होत आहे. आयपीएलचा सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या रंगणार आहे. नवे नियम आणि नव्या कर्णधारांमुळे यंदाची आयपीएल विशेष असणार आहे. मात्र आयपीएलच्या पूर्वसंध्येला आरसीबीचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली याची जोरदार चर्चा रंगली आहे.

वर्षभरापासून क्रिकेटप्रेमींच्या प्रतिक्षेत असलेल्या आयपीएलच्या 17 व्या पर्वाची सुरूवात उद्यापासून (22 मार्च) होत आहे. आयपीएलचा सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या रंगणार आहे. नवे नियम आणि नव्या कर्णधारांमुळे यंदाची आयपीएल विशेष असणार आहे. मात्र आयपीएलच्या पूर्वसंध्येला आरसीबीचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली याची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण आपल्या विश्वविक्रमापासून विराट कोहली केवळ सहा धावांनी लांब आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात आरसीबीने फलंदाजी घेत विराट कोहलीने सहा धावा केल्यास त्याच्या 12000 धावा पूर्ण होणार आहेत. (virat kohli 6 runs away from 12000 runs in indian primier league ipl 2024)

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली याने सहा धाव केल्यानंतर त्याच्या आयपीएलमधील 12000 धावा पूर्ण होणार आहेत. विशेष म्हणजे टी-20 क्रिकेटमध्ये 12 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावावर 11 हजार 994 धावा आहेत. त्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. तसेच,, शिखर धवन तिसऱ्या तर सुरेश रैना चौथ्या आणि रॉबिन उथप्पा पाचव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय

  • विराट कोहली : ११ हजार ९९४ धावा
  • रोहित शर्मा : ११ हजार १५६ धावा
  • शिखर धवन : ९ हजार ६४५ धावा
  • सुरेश रैना : ८ हजार ६५४ धावा
  • रॉबिन उथप्पा : ७ हजार २७२ धावा

दरम्यान, आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी आयपीएल स्पर्धेतील सर्व संघाच्या करणधारांचे नुकताच फोटो शूट झाले. या फोटो शूटमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसत आहे. तसेच, भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड असणार आहे.


हेही वाचा – IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीऐवजी मराठमोळा ऋतुराज गायकवाड करणार CSKचे नेतृत्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -