घरक्रीडा'मशीन गन' अखेर धडाडली

‘मशीन गन’ अखेर धडाडली

Subscribe

इंग्लंडमध्ये विराटनं पहिलं शकत झळकवलं आपलं अपयश मागे सोडलं आहे. एका बाजूला संपूर्ण भारताची टीम ढेपाळत असाताना आपण इथे इंग्लंडला भारताच्या टीमला जिंकवून द्यायला आलो आहोत हे विराटनं स्वतःचं वाक्य खरं करून दाखवलं

गेले बरेच दिवस मागच्या इंग्लंडच्या दौऱ्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ही ‘मशीन गन’ धडाडली आहे. पहिल्याच मॅचमध्ये आपला मनसुबा काय आहे हे दाखवून दिलं आहे. मॅचमध्ये विराटला दोन जीवनदान मिळाल्यानंतरही त्यानं आपल्या बॅटिंगवर कोणताही परिणाम होऊ न देता, एका बाजूनं किल्ला लढवला. एका बाजूनं संपूर्ण टीम ढेपाळत असतानाही आपल्या कॅप्टन पदाची जबाबदारी निभावत त्यानं १४९ रन्स बनवत इंग्लंडमधील मागचं आपलं अपयश धुऊन काढत एक नवा इतिहास बनवला. इतकंच नाही तर, टीम इंडियाला नामुष्कीपासूनदेखील वाचवलं.

इंग्लंडमध्ये पहिलं शतक

इंग्लंडमध्ये विराटनं पहिलं शकत झळकवलं आपलं अपयश मागे सोडलं आहे. २०१४ मधील दौऱ्याच्या वेळी विराटनं पाच टेस्ट मॅचमध्ये २८८ बॉल्स खेळले तर केवळ १३४ रन्स बनवले होते. २०१८ मधील दौऱ्यात त्याने पहिल्याच मॅचमध्ये २५५ बॉल्स खेळत १४९ रन्स बनविल्या आहेत. दुसऱ्या बाजूला संपूर्ण टीम ढेपाळत असतानाही विराट एकतर्फी खेळत राहिला. अश्विनची ७ वी विकेट गेली तेव्हा भारताची टीम केवळ १६९ रन्सवर खेळत होती. तेव्हा विराट केवळ ५७ रन्सवर होता. मात्र त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी त्याला साथ देत भारताला चांगल्या स्थिती आणले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही बॉलर्सनं इतक्या वेळात मिळून केवळ ८ रन्स बनविल्या तर केवळ एकट्या विराटनं ९९ रन्स बनविल्या आणि भारताला नामुष्कीपासून वाचवलं.

- Advertisement -

विराटनं केलं स्वतःला सिद्ध

एका बाजूला संपूर्ण भारताची टीम ढेपाळत असाताना आपण इथे इंग्लंडला भारताच्या टीमला जिंकवून द्यायला आलो आहोत हे विराटनं स्वतःचं वाक्य खरं करून दाखवलं. दुसऱ्या बाजूला काय होत आहे याचा दबाव स्वतःवर न घेता नैसर्गिक खेळ करत विराटनं भारताला मजबूत स्थितीमध्ये आणलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -