मुंबईच्या रस्त्यावर विराट अनुष्काची स्कूटी राईड

virat kohli and anushka sharma enjoy scooty ride in mumbai

टीम इंडियाचा ‘रन मशीन’ ओळख असलेला स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्कूटीवरून मुंबईच्या रस्त्यांवर पावसाचा आनंद लुटताना दिसले. विराट कोहली आणि अनुष्का एका जाहिरातीच्या फोटोशूटसाठी शनिवारी मालाडच्या मड आयलंडमध्ये पोहचले होते. यावेळी मुंबईच्या रस्त्यांवर त्यांनी स्कूटीवरून पावसाचा आनंद घेतला. यावेळी विरुष्काने स्कूटी राईडदरम्यान रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करताना दिसले, दोघेही डोक्यात हेल्मेट घातले होते.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माने ब्लॅक हेल्मेट घातलेले दिसतेय. यात कोहली स्कूटी चालवत असून अनुष्का शर्मा त्याच्या मागे बसली आहे. अनुष्काने पूर्णपणे ब्लॅक आउटफिट परिधान केलेला दिसतोय. तर दुसरीकडे किंग कोहलीने व्हाईट शूजसह ग्रीन शर्ट आणि ब्लॅक जीन्स परिधान केली आहे. कोणी आपल्याल्या ओळखू नये असा वाटत असताना अनेक चाहत्यांनी त्यांना ओळखले आणि त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


चाहत्यांनी त्यांना ओळखल्याने दोघांनाही जास्त वेळ स्कूटी राईड करता आली नाही. विरुष्काने त्यांच्या स्कूट राईडला सुरुवात केली तेव्हा हलका पाऊस पडत होता. त्यामुळे मुंबईच्या या मजेशीर पावसात त्यांनाही स्कूटी राईडचा आनंद घेता आला.

विराट कोहली आशिया कप 2022 च्या तयारीत व्यस्त आहे, परंतु आशिया कपसाठी यूएईला रवाना होण्यापूर्वी त्याल काही प्रोजेक्टचे शूट पूर्ण करायचे आहेत, कारण त्यानंतर त्याला वेळ मिळणं अवघड होणार आहे. कारण आशिया कपनंतर सलग दोन सिरीज आणि त्यानंतर ऑस्ट्रोलियामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टी -20 वर्ल्ड कप होणार आहे. यामुळे विराट कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवत असून तो वेळ एन्जॉय करतोय.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तसेच सध्याच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरही तो संघाचा भाग नाही. आता कोहली थेट आशिया कपच्या माध्यमातून संघात प्रवेश करेल. आशिया कप या महिन्याच्या 27 तारखेपासून सुरू होत असून 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्या स्पर्धेत भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.


जाहिरातीमुळे हृतिक रोशन वादाच्या भोवऱ्यात; पुजाऱ्यांकडून माफीची मागणी