Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानात पुन्हा भिडले; सामन्यानंतर दोघांवरही कारवाई

विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानात पुन्हा भिडले; सामन्यानंतर दोघांवरही कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा एकदा मैदानात भिडल्याचे पाहायला मिळाले. या दोघांच्या वादाची IPL च्या व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेतली असून दोघांनाही दंड ठोठावला आहे.

लखनऊच्या एकना स्टेडियमवर सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ जायंट्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने संघाने निर्धारीत 20 षटकात 9 विकेट गमावून 126 धावा केल्या. कमी धावसंख्येचा सामना जिंकणे लखनऊ संघासाठी सोपे होते, परंतु एकामागून एक विकेट पडत गेल्यामुळे लखनऊला 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हस्तांदोलन करत होते. या दरम्यान कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला.

- Advertisement -

कोहली लखनऊच्या इतर खेळाडूंशीही हस्तांदोलन करत असताना त्याने गौतम गंभीरशी हस्तांदोलन केले तेव्हा गंभीर रागात दिसला. त्याने पंचांशी हस्तांदोलन केले त्यावेळी तो रागात काहीतरी बोलला. यानंतर कोहलीने नवीन-उल-हकशी हस्तांदोलन करताना त्याला काहीतरी म्हणत पुढे गेला. नवीनने विराटला उत्तर दिले आणि विराटनेही त्याला पुन्हा उत्तर दिल्यामुळे नवीन कोहलीच्या दिशेने वळला. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने नवीनला दूर केल्यानंतर विराट पुढे निघून गेला. पण मेयर्स कोहलीजवळ आला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. तेव्हा गंभीरने मेयर्सला ओढत बाजूला केले.

- Advertisement -

यानंतर विराट डुप्लेसीशी बोलू लागला आणि गंभीरशी लांबूनच हातवारे करत काहीतरी बोलत होता. त्याच्या बोलण्याला गंभीरही उत्तर देत होता. मात्र यावेळी गंभीरचा पारा चढलेला होता. त्याला केएल राहुलने शांत करण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी विराट गंभीरकडे गेला आणि वाद घालू लागला. प्रकरण वाढत असल्याचे पाहिल्यावर दोन्ही संघांचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळे केल्यानंतर प्रकरण शांत केले. या सगळ्या प्रकरणानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरवर IPL च्या व्यवस्थापकांकडून कारवाई करण्यात आली आहे. या दोघांना 100 सामन्याच्या रक्कमेतून दंड भरावा लागणार आहे. तर नवीन उल हक याला सुद्धा सामन्यातून मिळणाऱ्या रक्कमेमधून 50 टक्के दंड म्हणून भरावा लागणार आहे.

मागील सामन्यातील प्रकराला विराटने उत्तर दिले
बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर या दोन्ही संघात पार पडलेल्या 15 व्या सामन्यात लखनऊ संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता. यावेळी लखनऊ संघाचा मार्गदर्शक गंभीरने बेंगळुरूच्या खेळाडूंकडे बोट करून शांत राहण्याचा इशारा केला होता. याशिवाय मॅचविनिंग खेळी करणाऱ्या पूरनने फ्लाइंग किस केले होते आणि रवी बिश्नोईने मोठ्याने ओरडून आनंद साजरा केला. या तिन्ही गोष्टी विराटने सोमवारच्या सामन्यात करताना लखनऊ संघाला चांगलेच उत्तर दिले.

- Advertisment -