घरक्रीडाशास्त्री-कोहलीमध्ये अनेकदा भांडण होते; निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा खुलासा

शास्त्री-कोहलीमध्ये अनेकदा भांडण होते; निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा खुलासा

Subscribe

भारताची संघाची निवड करणे किती अवघड काम आहे हे तुम्ही कोहली आणि शास्त्री यांना विचारा, असे प्रसाद म्हणाले. 

भारतीय संघाची निवड करताना प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांचेही मत विचारात घेतले जाते. अनेकदा या दोघांमध्ये, तसेच त्यांचे आणि निवड समितीचे एकमत होत नाही. त्यामुळे त्यांचे अनेकदा टोकाचे भांडण होते, असा खुलासा भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी केला आहे. प्रसाद यांनी जवळपास चार वर्षे निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. तसेच त्यांना केवळ २३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असल्याने त्यांच्यावर चाहते आणि काही क्रिकेट समीक्षकांनी बरेचदा टीकाही केली. परंतु, भारताची संघाची निवड करणे किती अवघड काम आहे हे तुम्ही कोहली आणि शास्त्री यांना विचारा, असे प्रसाद म्हणाले.

एकमेकांचे तोंडही बघायचे नसायचे

भारतीय संघाची निवड करताना आमच्यात किती वेळा भांडण झाले हे तुम्ही कोहली आणि शास्त्री यांना विचारा. काही वेळा बैठकीनंतर आम्हाला एकमेकांचे तोंडही बघायचे नसायचे. परंतु, लगेच दुसऱ्या दिवशी आमचे भांडण मिटायचे. दुसऱ्याचे मत योग्य असल्याचे आम्ही मान्य करायचो. मी व्यवस्थापनाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे गोष्टी कशा हाताळायच्या हे मला ठाऊक आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यांचे सर्व निर्णय मान्य नाही करायचो

माझ्यात, कोहली आणि शास्त्री यांच्यात अनेकदा भांडण झाले. आम्ही लोकांसमोर आमच्यात मतभेद असल्याचे कधीही दाखवले नाही. मात्र, याचा अर्थ मी त्यांचे सर्व निर्णय मान्य करायचो असे नाही. मी त्यांना अनेकदा माझे निर्णय पटवून दिले होते, असे प्रसाद म्हणाले. प्रसाद यांची २०१६ मध्ये निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ एकदिवसीय वर्ल्डकप या आयसीसीच्या दोन स्पर्धांसाठी भारतीय संघ निवडला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -