विराट कोहली आणि रोहित शर्माला वनडे रँकिगमध्ये मोठा फायदा, पहिल्या क्रमांकावर कोण?

आयसीसीने वनडे रँकिंग जारी केली आहे. या रँकिंगमध्ये रनमशीन विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्माला मोठा फायदा झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. तर रोहित शर्मानेही उत्कृष्ट फलंदाजी केली होती. कोहलीने ११३ आणि रोहितने ८३ धावा केल्या होत्या. परंतु कोहलीने शतक ठोकल्यामुळे रँकिंगमध्ये २ स्थानांनी त्याचा फायदा झाला आहे. विराटने वनडे मालिकेत ४५ वं शतक ठोकलं. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत विराट कोहली ८व्या स्थानावरून ६व्या स्थानी आला आहे.

विराट कोहलीसह रोहित शर्माने आपल्या खेळीत चांगली सुधारणा केली आहे. रोहितनेही ८३ धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने ९ चौके आणि ३ षट्कार लगावले आहेत. त्यामुळे रोहित शर्माला एक स्थानाचा फायदा झाला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही भारतीय फलंदाजाच्या टॉप १०च्या यादीत आहेत. मात्र, पहिल्या क्रमाकांवर कोण?, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. यावेळी पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने फलंदाजीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

बाबर आझमच्या नावावर ८९१ रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा रसी वान डेर डुसे हा ७६६ रेटिंग्ससह दुसऱ्या, इमाम उल हक तिसऱ्या, क्विंटन डी कॉक चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर ५व्या स्थानी विराजमान आहे. भारताचा वेगवान फलंदाज मोहम्मद सिराजने २२ व्या क्रमाकांवरून थेट १८वं स्थान गाठलं आहे. यावेळी सिराजला चार स्थानांचा फायदा झाला आहे.

T20 मध्ये सूर्यकुमार पहिल्या स्थानावर

सूर्यकुमारने T20 क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावले. बांगलादेशचा शाकिब अल हसन T20 मध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर राशीद खानने गोलंदाजांच्या क्रमवारीत वानिंदू हसरंगाला मागे टाकले आहे.


हेही वाचा : ‘बीसीसीआयमध्ये भाजपाची मानसिकता’; पाकिस्तानचे माजी अध्यक्ष रमीझ राजांचा दावा