Homeक्रीडाICC Ranking : आयसीसी क्रमवारीत कोहली-रोहितची घसरगुंडी; खराब फॉर्ममुळे नुकसान

ICC Ranking : आयसीसी क्रमवारीत कोहली-रोहितची घसरगुंडी; खराब फॉर्ममुळे नुकसान

Subscribe

मेलबर्न सामन्यातील पराभवामुळे आता भारतीय संघाचा आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचा रस्ता अवघड झाल्याचे चित्र आहे. अशातच आयसीसीने आज जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत भारताला 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारतयी संघाला हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण या पराभवामुळे आता भारतीय संघाचा अंतिम सामन्यात जाण्याचा रस्ता अवघड झाल्याचे चित्र आहे. अशातच आयसीसीने आज जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Virat Kohli and Rohit Sharma slide in ICC rankings)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही दिग्गज खेळाडू खराब फॉर्मशी झुंजत आहेत. रोहितच्या संघातील स्थानावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे रोहित शर्माची खराब कामगिरी सुरूच आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या तीन सामन्यांमध्ये रोहितने केवळ 31 धावा केल्या आहेत. सलग डावात झटपट बाद झाल्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत रोहितची 40व्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याच्या नावावर 560 रेटिंग्स आहेत.

- Advertisement -

विराट कोहलीने शेवटच्या 19 डावात 417 धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत कोहलीला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कोहली पहिल्या डावात 36 आणि दुसऱ्या डावात फक्त 5 धावा करून बाद झाल्या होत्या. याचा फटका आता कोहलीला क्रमवारीत बसला आहे. तो 633 रेटिंग गुणांसह 24 व्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BGT IND vs AUS : भारताचा प्रशिक्षक ‘गंभीर’, खेळ न दाखवल्यास खेळाडूंना मिळणार धन्यवाद देण्याचा इशारा

यशस्वी जैस्वालची क्रमवारीमध्ये झेप

दरम्यान, मेलबर्न कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वालने क्रमवारीत झेप घेतली आहे. तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने चौथ्या सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात त्याने 82 आणि दुसऱ्या डावात 84 धावांची खेळी खेळली. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही मेलबर्नमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात मालिकेतील दुसरे शतक झळकावून तीन स्थानांनी झेप घेतली आहे. स्टीव्ह स्मिथ सध्या 763 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे, तर इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट 895 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -