घरक्रीडाIND vs NZ 2nd Test : पंचाच्या चुकीच्या निर्णयानंतर विराटचा राग अनावर;...

IND vs NZ 2nd Test : पंचाच्या चुकीच्या निर्णयानंतर विराटचा राग अनावर; काय झाले पहा व्हिडिओ

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली एजाज पटेलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला

भारत आणि न्यूझीलंडमधील मुंबईतील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या चांगल्या सुरूवातीनंतर भारतीय संघाचा डाव हलकासा बिघडला आणि संघाने ८० धावांवर आपले तीन बळी गमावले. विश्रांतीनंतर पुनरागमन करत असलेला कर्णधार विराट कोहली देखील काही खास करू शकला नाही आणि खाते न उघडताच माघारी परतला. भारताचा कर्णधार एजाज पटेलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. मात्र तो खूप वादाचा निर्णय ठरला आहे. विराट कोहलीला बाद दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. खुद्द विराट कोहली देखील टीव्ही अंपायरच्या निर्णयावर हैरान झाला होता. हा पूर्ण प्रकार भारताच्या डावातील ३० व्या षटकात झाला. एजाज पटेलचा चेंडू पहिल्यांदा पॅडवर लागला आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर पंच अनिल चौधरी यांनी कोहलीला बाद घोषित केले.

- Advertisement -

पंच अनिल चौधरी यांनी बाद घोषित केल्यानंतर लगेचच कोहलीने तिसऱ्या अंपायरकडे धाव घेतली. मात्र रिप्लेमध्ये समजले की कोहलीच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला होता. मात्र हे पाहणे कठीण होते की चेंडू पॅडला लागायच्या अगोदर बॅटला लागली की दोन्हींचा संपर्क एकसाथ झाला. तिसरे अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी मैदानावरील पंचाच्या निर्णयावर जाण्याचे योग्य समजले आणि बाद घोषित करण्यात केले.

- Advertisement -

तिसऱ्या अंपायरने बाद घोषित केल्यानंतर कोहली लगेचच मैदानावरील फिल्डिंग अंपायर नितिन मेनन यांच्याकडे गेला. दोघांमध्ये खूप वेळ चर्चा झाली. त्याच्यानंतर कोहली मोठी पाऊले टाकत मैदानातून बाहेर गेला. ड्रेसिंगरूमकडे जाताना कोहली खूप रागात दिसला आणि त्याने बाउंड्री लाइनवर त्याची बॅट जोरात आपटली.


हे ही वाचा: http://IND vs NZ 2nd Test : कोहलीच्या विकेटने वादाला तोंड फुटले; माजी क्रिकेटपटूंची आली प्रतिक्रिया


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -