विराटची हाफ सेंच्युरी अन् वामिकाचा पहिला लुक व्हायरल !

विरुष्काच्या लेकीचे वामिकाचे फोटो आणि व्हिडीओ फार वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनुष्काच्या कडेवर असलेल्या वामिकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पिंक कलरचा फ्रॉक आणि दोन बो बांधलेली वामिका पप्पा विराटला चेअर अप करताना फार क्यूट दिसत होती.

Virat Kohli Anushka Sharma daughter vamika first look goes viral between ind vs sa match
विराटची हाफ सेंच्युरी अन् वामिकाचा पहिला लुक व्हायरल !

भारताचा लाडका क्रिकेटर विराट कोलही (Virat Kohli)  आणि बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिकाला (Vamika) पाहण्यासाठी अनेक दिवस त्यांचे चाहचे उत्सुक होतो. त्या चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली असून बेबी वामिकाची पहिली झलक सर्वांसमोर आली. रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत केपटाउनमध्ये रंगलेल्या वन डे सामन्यादरम्यान अनुष्का बेबी वामिकाला घेऊन थेट स्टेडिअमवर पोहोचली. आईच्या कडेवर पप्पा विराटला चेअर अप करणारी वामिका प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सच्या कॅमेरात कैद झाली. विराटची हाफ सेंच्युरी आणि वामिकाचा पहिला लुक चांगलाच व्हायरल झाला. वामिकाची पहिली झलक सर्वांसाठी एक सप्राइज ठरले. विराटने देखील हा सामना लेकीच्या नावाने डेडिकेट केला.

विरुष्काच्या लेकीचे वामिकाचे फोटो आणि व्हिडीओ फार वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनुष्काच्या कडेवर असलेल्या वामिकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पिंक कलरचा फ्रॉक आणि दोन बो बांधलेली वामिका पप्पा विराटला चेअर अप करताना फार क्यूट दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

क्यूट वामिकाचे फोटो पाहून चाहते पूर्ते हैराण झाले असून अनुष्का आणि विराटचे लहानपणीचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. अरे ही छोटी विराट असे म्हणत वामिका आणि छोट्या विराटचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहे. खरंतर वामिका ही अनुष्काची लहानपणीची छबी आहे असे म्हटले जात होते प्रत्यक्षात वामिका ही हुबेहूब विराट कोहली सारखी दिसतेय. वामिकाचे डोळे मात्र अनुष्का सारखे असल्याची प्रतिक्रीया चाहत्यांकडून येत आहेत.

वामिकाची पहिली झलक पाहून काही चाहते फार खुश झालेत तर काही चाहत्यांनी वामिकाच्या व्हायरल व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे. विराट आणि अनुष्काच्या परवानगी शिवाय फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप विराट आणि अनुष्काकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.