IPL 2021 : विराट RCB साठी सर्वात अपयशी कर्णधार, आकडे बोलतात

RCB च्या आयपीएल विजेते पदाचे स्वप्न भंग..

virat kohli last match for RCB as captain IPL 2021

विराट कोहलीने याआधीच केलेल्या घोषणेनुसार सोमवारी ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदाचा शेवटचा आयपीएल सामना खेळला. कोलकत्ता नाइट राइडर्स विरूध्दच्या सामन्यात विराटच्या आरसीबीचा पराभव झाला खरा, पण या सामन्याने आयपीएलचा किताब जिंकण्याचेही किंग कोहलीचे स्वप्न संपुष्टात आले. आयपीएल २०२१ चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असतानाच सोमवारी झालेल्या पराभवाच्या बदल्यात आरसीबीचे यंदाचे आयपीएल मालिकेतील आव्हान संपुष्टात आले. विराटच्या नेतृत्वात आरसीबीच्या टीमने आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळले आहेत. पण विराटच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ सर्वाधिक सामने पराभूत झाला आहे.

कोलकात्याविरोधातील पराभवामुळे रॉयल चँलेंजर्स बेंगळुरूचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले आहे. सोमवारी झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात कोहलीच्या आरसीबीचा केकेआर कडून पराभव करण्यात आला. कर्णधार विराट कोहलीचा कर्णधार पदाचा प्रवास या पराभवासोबत समाप्त झाला. विराट कोहलीला आता आरसीबीचा कर्णधार म्हणून खेळताना बघता येणार नाही. विराटनेच आयपीएल २०२१ चा दुसरा हंगाम सुरू होण्यापूर्वी ही माहिती दिली होती. केकेआर विरूध्दच्या सोमवारच्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३८ धावा केल्या, बदल्यात केकेआरने हे धावांचे लक्ष्य शेवटच्या षटकात ४ गडी राखून पूर्ण केले.

विराट कोहलीच्या आयपीएलच्या कारकिर्दीत आपल्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात आरसीबीला आयपीएलचा किताब जिंकवून देता आले नाही. आरसीबीच्या कर्णधार पदाची धुरा कोहलीने २०१३ पासून सांभाळली होती. तसचे २०११, २०१२ मध्ये मोजक्याच सामन्यात विराट कर्णधार म्हणून खेळत होता. तेव्हा पासून आतापर्यंत १४० सामन्यांत कोहलीने कर्णधारपदाचे नेतृत्व केले आहे, त्याच्या नेतृत्वात आरसीबीने ६४ सामन्यांत विजय तर ६८ सामन्यांत पराभव, अशी कामगिरी केली आहे.

RCB साठी सर्वात जास्त सामन्यांसाठी असलेलेल कर्णधार –

विराट कोहली – एकूण सामने १४०, विजयी ६४, पराभूत ६९
अनिल कुंबळे – एकूण सामने २६, विजयी १५, पराभूत ११
डेनियल विटोरी -एकूण सामने २२, विजयी १२, पराभूत १०

विराटने केले होते स्पष्ट –

आयपीएल २०२१ चे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वीच विराटने स्पष्ट केले होते की, तो चालू हंगामानंतर कर्णधार पद सोडणार आहे. त्याच्यासोबतच त्याने त्याच्या समर्थकांना विश्वास दिला होता की त्याला ह्याच्यापुढे देखील आरसीबी सोबतच रहायची इच्छा आहे अशी त्याने इच्छा व्यक्त केली होती. पण एक फलंदाज म्हणून संघासाठी चांगली कामगिरी करत राहणार असल्याचे देखील त्याने सांगितले. विराटने आरसीबी सोबतच भारतीय टी ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाचा देखील राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ नंतर होणारा टी ट्वेंटी विश्वकप विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळली जाणारी भारतीय संघाची टी ट्वेंटीची शेवटची मालिका असणार आहे.

विराटने का सोडले कर्णधारपद ?

मागच्या काही वर्षांपासून विराट कोहली भारतीय संघासाठी तीनही प्रकारातील सामन्यांचे नेतृत्व करत होता. ह्याच्या सोबतच आरसीबीचा देखील कर्णधार होता, पण कर्णधार पदाच्या या मोठ्या कार्यकाळात विराटच्या नेतृत्वात ना आरसीबीला आयपीएलचा किताब जिंकण्यात यश आले, नाही भारतीय संघाला कोणत्या मोठ्या मालिकेवर ताबा मिळवता आला. विराट कोहलीचे प्रदर्शन देखील मागच्या काही सामन्यांत निराशाजनक होते. जवळजवळ एक वर्ष झाले असेल विराटच्या खेळीतून शतकीय खेळी पहायला मिळाली होती. त्याच्यातच विराट कडून सांगण्यात आले होते, की तो जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी कर्णधारपद सोडत आहे म्हणजे पूर्ण वेळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता येऊ शकेल.


हेही वाचा – भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, विरोधात जाण्याची कोणाचीही हिंमत नाही- इमरान खान