घरक्रीडाटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या 4000 धावा पूर्ण; तर 3 विक्रमांना गवसणी

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या 4000 धावा पूर्ण; तर 3 विक्रमांना गवसणी

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावे विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. आतपर्यंत क्रिकेट विश्वात कोणत्याही खेळाडूला कामगिरी जमली नाही, अशी कामगिरी विराट कोहली याने केली.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावे विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. आतपर्यंत क्रिकेट विश्वात कोणत्याही खेळाडूला कामगिरी जमली नाही, अशी कामगिरी विराट कोहली याने केली. विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केले आहेत. 4000 धावा करणार पहिला फलंदाज बनला आहे. (Virat Kohli Becomes First Batter To Score 4000 Runs In T20 World Cup 2022)

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीला हा विक्रम करण्यासाठी फक्त 42 धावांची गरज होती. पण त्याने इंग्लंडविरुद्ध ताबडतोड अंदाजमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या आहेत.

- Advertisement -

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 82, नेदरलँड्सविरुद्ध 62, बांगलादेशविरुद्ध 64 तर झिम्बाब्वेविरुद्ध 26 धावा केल्या. 5 पैकी 3 डावात तो नाबाद राहिला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने दमदार फलंदाजी केली आहे. भारताच्या संघाला डाव सावरत कोहलीने यावेळी विश्वविक्रम रचलेला आहे.

विराट कोहलीने 114 सामन्यातील 106 डावात 52.77च्या सरासरीने आणि 138.15च्या स्ट्राइक रेटने 3958 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या अव्वल स्थानी आहे.

- Advertisement -

टी-20 विश्वचषकातील 5 सामन्यात त्याने 123च्या सरासरीने 246 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहली याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3000 धावा करणारा पहिला क्रिकेटर बनला होता. गेल्या वर्षी त्याने ही कामगिरी केली होती. कोहलीने 87 सामन्यांच्या 81 डावांमध्ये 50.86 च्या सरासरीने 3 हजार धावा केल्या.

वर्ल्डकपमध्येही 1100 धावा

विराट कोहलीने T20 वर्ल्ड कपमध्ये 1100 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या आधी इथे कोणीही पोहोचू शकत नव्हते. त्याने सामन्याच्या 25 डावात 1141 धावा केल्या आहेत. विराटने 14 अर्धशतके केली आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने 1016 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतर कोणत्याही फलंदाजाला 1000 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. ख्रिस गेल 965 धावांसह तिसऱ्या तर रोहित शर्मा 963 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान 897 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

तिसऱ्यांदा 250 पेक्षा जास्त धावा

विराट कोहलीने सध्याच्या T20 विश्वचषकात 250 धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी त्याने तिसऱ्यांदा केली आहे. जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला एकापेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने 2013-2014 मध्ये सर्वाधिक 319 धावा केल्या. तो एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. यापूर्वी त्याने 2015-16 मध्येही 273 धावा केल्या होत्या. T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 3 अर्धशतके झळकावणारा कोहली हा पहिला खेळाडू आहे.


हेही वाचा – 35 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड आमने-सामने

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -