घरक्रीडाIND vs SA, ODI Series: विराट कोहली मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा मोठा...

IND vs SA, ODI Series: विराट कोहली मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड, फक्त ९ धावांची गरज

Subscribe

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना बुधवारी खेळला जाणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इतिहास घडवण्यासाठी फक्त ९ धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यात जर विराट कोहलीने ९ धावा पूर्ण केल्या तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो.

कोहलीने ९ धावा पूर्ण केल्यानंतर वनडे इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियासाठी परदेशात सर्वात जास्त धावा काढणार फलंदाज ठरणार आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने टीम इंडियाकडून परदेशात वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. सचिन तेंडुलकरने १४७ सामन्यांमधून ३७.२४ च्या सरासरीत ५ हजार ६५ धावा काढल्या आहेत. तसेच १२ शकतं आणि २४ अर्धशतकं झळकावले आहेत.

- Advertisement -

विराट कोहली एलीट यादीनुसार दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत १०७ सामन्यांमधून ५८.१२ च्या सरासरीत ५ हजार ५७ धावा काढण्यात आल्या आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १४५ इतक्या वनडे इंटरनॅशनल सामन्यात ४ हजार ५२० धावा काढल्या आहेत. त्यामुळे धोनी तिसऱ्या स्थानावर आहे.

ODI मध्ये भारतीय क्रिकेटपटूंच्या सर्वाधिक धावा –

सचिन तेंडुलकर – १४७ सामने – ५ हजार ६५ धावा

- Advertisement -

विराट कोहली – १०७ सामने – ५ हजार ५७ धावा

महेंद्रसिंग धोनी – १४५ सामने – ४ हजार ५२० धावा

राहुल द्रविड – ११७ सामने – ३ हजार ९९८ धावा

सौरव गांगुली – १०० सामने – ३ हजार ४६८ धावा


हेही वाचा : UP Assembly Election 2022 : ३०० यूनिट मोफत वीज मिळणार, उद्यापासून समाजवादी पार्टीच्या प्रचाराला सुरूवात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -