घरक्रीडाविराटच्या कर्णधार पदाबाबत BCCI कडून आली पहिली प्रतिक्रिया...

विराटच्या कर्णधार पदाबाबत BCCI कडून आली पहिली प्रतिक्रिया…

Subscribe

विराट कोहलीच्या नेतृत्वाच्या निमित्ताने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. आगामी काळात रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा एकीकडे रंगलेली असतानाच, बीसीसीआयने या संपुर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. आतापर्यंत झालेल्या टी २० स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला एकदाही या ट्रॉफीवर विजेतेपदाचे नाव कोरता आलेले नाही. त्यातच विराट कोहली टी २० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व कोहली सोडणार अशी बातमी समोर आल्याने चर्चेला मोठे उधाण आले. पण या सगळ्या चर्चांना अखेर बीसीसीआयचे स्पष्टीकरण आले आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धुमल यांनी या संपुर्ण प्रकरणाशी संबंधित प्रतिक्रिया दिली आहे. (Virat kohli captaincy BCCI reacted on rohit sharma leadership )

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष असलेल्या अरूण धुमल यांनी आइएएएसला दिलेल्या प्रतिक्रियेत या सगळ्या वृत्ताचे खंडन केले आहे. ह्या सगळ्या बातम्या निराधार असून असे काहीही घडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या बातम्या माध्यमांमधूनच पेरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआयच्या बैठकीनंतर ही माहिती समोर आल्याच्या बातमीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या सगळ्या अफवा आहेत. त्यामुळे असे काहीही घडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआयची अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. विराट कोहली सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करत आहे, त्यानुसारच हे कायम राहील असेही ते म्हणाले. त्यामुळे सध्या कोहली संघाचा कर्णधार आहे आणि तोच राहील असेही ते म्हणाले.

- Advertisement -

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीला डच्चू देतानाच रोहित शर्माकडे टी-२० आणि एक दिवसीय सामन्यांचे नेतृत्व दिले जाईल, अशा बातम्या समोर आल्या. कोहलीने कसोटीत चांगले काम केल्यानेच कसोटी संघाचे नेतृत्व विराटकडे राहील असे सांगण्यात आले. याआधीच्या आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयच्या मुख्य अधिकाऱ्याने संघ निवडीबाबत नाराजी व्यक्त केली होती.

पण या संपुर्ण प्रकरणात बीसीसीआयने स्पष्टीकरण देतानाच सांगितले की अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. तसेच संघ निवडीवरून कोणतीही नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी २०१४ मध्ये महेंद्र सिंह धोनीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपद आले होते. तेव्हापासून प्रत्येक आयसीसी टूर्नामेंटमध्ये विराटच्या टीमला अपयशच आले आहे. याआधी २०१७ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने चॅम्पिअन ट्रॉफी फायनलमध्ये भारताचा पराभव केला. त्यानंतर २०१९ एक दिवसीय विश्व चषकाच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करत या चषकावर आपले नाव कोरले.

- Advertisement -

हेही वाचा – विराट कोहलीचा विक्रम, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -